झोमॅटो आपल्या युजर्सना देतेय ‘अनलिमिटेड फ्री डिलीव्हरी’; तुम्हीही घेऊ शकता फायदा

ही सेवा निवडक वापरकर्त्यांसाठी सर्ज आणि डिस्टन्स फीवर सवलत देणार आहे. अमेझॉन प्राइम वापरकर्ते ज्या पद्धतीने मोफत डिलिव्हरीचे फायदे मिळवू शकतात, अगदी तशाच पद्धतीने झोमॅटोने आपल्या युजर्ससाठी ही योजना आणली आहे.

झोमॅटो आपल्या युजर्सना देतेय ‘अनलिमिटेड फ्री डिलीव्हरी’; तुम्हीही घेऊ शकता फायदा
झोमॅटो आपल्या युजर्सना देतेय ‘अनलिमिटेड फ्री डिलीव्हरी’
Follow us
| Updated on: Aug 03, 2021 | 8:18 AM

नवी दिल्ली : फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो सध्या निवडक वापरकर्त्यांसाठी (यूजर्स) झोमॅटो प्रो प्लस (Zomato Pro Plus) मेंबरशीप लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. झोमॅटो काही भाग्यवान वापरकर्त्यांना आमंत्रण पाठवेल, ज्याद्वारे ते वापरकर्ते झोमॅटो प्रो प्लसची मेंबरशीप सुरू करू शकतील. झोमॅटो प्रो प्लस वापरकर्त्यांसाठी ‘अनलिमिटेड फ्री डिलीव्हरी’च्या (अमर्यादित मोफत वितरण) फायद्यांचा दावा करते. कारण ही सेवा निवडक वापरकर्त्यांसाठी सर्ज आणि डिस्टन्स फीवर सवलत देणार आहे. अमेझॉन प्राइम वापरकर्ते ज्या पद्धतीने मोफत डिलिव्हरीचे फायदे मिळवू शकतात, अगदी तशाच पद्धतीने झोमॅटोने आपल्या युजर्ससाठी ही योजना आणली आहे. (Zomato offers its users ‘Unlimited Free Delivery’; You can also take advantage)

झोमॅटोच्या सीईओंचे ट्विट

कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपिंदर गोयल यांनी ट्विटरवर ही घोषणा केली. त्यांनी वापरकर्त्यांना झोमॅटो प्रो प्लस मेंबरशीप सुरू करण्याचे आवाहन केले, ही सुविधा वापरकर्त्यांसाठी मोठा फायदा घेऊन येईल. Zomato Pro Plus ची मेंबरशीप भाग्यवान वापरकर्त्यांना आमंत्रणाद्वारे पाठवली जाईल, ज्यासाठी वापरकर्त्यांना अ‍ॅप उघडावे लागेल आणि ते पात्र आहेत की नाही ते तपासावे लागेल. झोमॅटो एडिशन ब्लॅक क्रेडिट कार्डधारकांना आपोआप झोमॅटो प्रो प्लसमध्ये अपग्रेड केले जाईल. तसेच नियमित वापरकर्त्यांना झोमॅटो अ‍ॅपवरून प्रो प्लस अपग्रेड खरेदी करावे लागेल.

प्रो प्लस मेंबरशीप भारतातील 41 शहरांमध्ये उपलब्ध

‘आम्ही निवडक ग्राहकांसाठी आमची मर्यादित आवृत्ती प्रो प्लस मेंबरशीप सुरू करत आहोत,’ असे गोयल यांनी ट्विटरवर लिहिले आहे. अ‍ॅमेझॉनच्या प्राइम मेंबरशिपप्रमाणे अमर्यादित मोफत डिलिव्हरी ऑफर करणे ही कंपनीच्या ग्राहकांची सर्वात जास्त मागणी असलेल्या सुविधांपैकी एक सुविधा आहे, असेही गोयल यांनी नमूद केले आहे. झोमॅटो प्रो प्लसच्या सदस्यांना अतिरिक्त लाभ दिले जातील. त्याचबरोबर झोमॅटो प्रोचे फायदेदेखील उपलब्ध असतील. प्रो प्लस मेंबरशीप भारतातील 41 शहरांमध्ये उपलब्ध असेल, जिथे झोमॅटो आपली प्रो मेंबरशीप प्रदान करते.

अतिरिक्त सवलतींबरोबरच जेवणावर 40 टक्के सूट

या महिन्याच्या सुरुवातीला झोमॅटो गोल्डला झोमॅटो प्रोमध्ये अपग्रेड केले गेले होते, जे डिलिव्हरीबरोबरच डायनिंगवरही सवलत देते. झोमॅटो प्रो वापरकर्त्यांना अतिरिक्त सवलतींबरोबरच जेवणावर 40 टक्के सूट मिळते. तसेच ऑर्डरची 20 टक्के जलद डिलीव्हरी तसेच इतर ऑफर्सअतिरिक्त अतिरिक्त सवलतसुद्धा देते. आतापर्यंत झोमॅटोमध्ये 1.8 दशलक्ष झोमॅटो प्रो सदस्य आहेत. प्रो मेंबरशिपची किंमत तीन महिन्यांसाठी 200 रुपये आणि वार्षिक मेंबरशिपसाठी 750 रुपये आहे. तसेच झोमॅटो प्रोच्या वापरावर कोणतीही दैनिक, साप्ताहिक किंवा मासिक मर्यादा नाही. (Zomato offers its users ‘Unlimited Free Delivery’; You can also take advantage)

इतर बातम्या

सावधान! व्हीआयपी मोबाईल नंबर मिळवून देण्याच्या नावाखाली लाखोंचा गंडा; मुंबईत गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश

राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये निर्बंधांत काही प्रमाणात सूट, ठाणे, मुंबई आणि उपनगराचा निर्णय नेमका काय?

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.