कृषी बजेट 2024
ग्रामीण अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देणं हा कृषी अर्थसंकल्पाचा हेतू आहे. अनेक कृषी योजना शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार बजेटमधून अनेक प्रयत्न करत असते. कृषी बजेटमध्ये उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळही ठेवला जातो. त्यासाठी एक ठराविक रक्कम निर्धारीत केली जाते. शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावणं, शेतीत सुधारणा होणं, शेतीत नवीन प्रयोग होणं आदी गोष्टींवर या बजेटमध्ये भर दिलेला असतो.