बाप्पा मोरया
गणेशोत्सव हा भारतातील एक प्रमुख उत्सव आहे. खासकरून महाराष्ट्रात हा उत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रासह देशाच्या विविध राज्यांमध्येही गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. 19व्या शतकात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी हा उत्सव सुरू केला. त्याला सार्वजनिक गणेशोत्सवाचं रुप दिलं. या उत्सवाच्या माध्यमातून भारतीयांना एकत्र करण्याचा या मागचा उपयोग होता. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात नागरिकांना एकत्र करण्याची गरज होती. त्यातूनच गणेशोत्सवाची संकल्पना पुढे आली. गणेशोत्सवाचा सोहळा तब्बल दहा दिवस चालतो. दीड, पाच, सात आणि 10 व्या दिवशी गणेशाचं विजर्सन केलं जातं.