शेतकरी
देशात 60 टक्के शेतकरी आहेत. मात्र, प्रत्येक राज्यातील आणि त्या राज्यातील प्रत्येक जिल्हा, तसेच प्रांतातील शेतकऱ्यांची स्थिती एक सारखी नाहीये. प्रत्येक शेतकऱ्याची परिस्थिती, त्याच्यासमोरील आव्हाने आणि समस्या वेगळ्या आहेत. कधी पावसाने दिलेली ओढ तर कधी पावसाने उडवून दिलेली दाणादाण... कधी ओला तर कधी सुका दुष्काळ यामुळे शेतकरी वर्गाचं नेहमी नुकसान होत असतं. अशावेळी सरकार शेतकऱ्यांसाठी भरीव योजना अंमलात आणते. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यापासून ते त्यांच्या मालाला भाव देण्यापर्यंतची कामे सरकार करत असते. सध्या स्वामिनाथन आयोग लागू करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. या बजेटमध्ये या मागणीवर विचार होतो की नाही हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.