होळी
होळी हा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण आहे. या दिवशी होळी पेटवून तिची पूजा केली जाते. होळीला पुरण पोळीचा नवैद्य दाखवला जातो. होळीची राख एकमेकांवर उडवली जाते. या दिवशी वेगवेगळी वेशभूषा केलेल्या मुलांची मिरवणूक निघते. याला वीराचा पाडवाही म्हणतात. तर धुलिवंदन किंवा रंगपंचमी हा सण होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. वसंत ऋतूशी संबंधित हा उत्सव आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला हा सण साजरा केला जातो. उन्हाचा तडाखा कमी व्हावा आणि गारवा मिळावा म्हणून या दिवशी एकमेकांवर पाणी उडवण्याची पद्धत आहे. तसेच एकमेकांना रंग लावूनही हा उत्सव साजरा केला जातो. या सणाला धार्मिकही महत्त्व आहे.