ICC Womens T20 World Cup 2024
महिला वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचं आयोजन हे यूएई येथे करण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण 18 दिवसात 23 सामने खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेला 3 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर 20 ऑक्टोबरला अंतिम सामना पार पडेल. वूमन्स टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत एकूण 10 संघ भिडणार आहेत. या स्पर्धेसाठी 10 पैकी 8 संघ थेट पात्र ठरलेत. तर स्कॉटलँड (क्वालिफायर 2) आणि श्रीलंका (क्वालिफायर 1) या दोन्ही संघांनी पात्रता फेरीतून वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळवलंय. एकूण 10 संघांना 5-5 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. प्रत्येक संघ साखळी फेरीत 4 सामने खेळणार आहे.
वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंडचा असा होता प्रवास, पहिल्याच सामन्यात भारताला दिलेला दणका
वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा थरार अखेर संपला आहे. गेल्या 18 दिवसांपासून सुरु असलेलं वर्ल्डकपचं वादळ शमलं आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडने दक्षिण अफ्रिकेला पराभूत करत जेतेपदावर नाव कोरलं आहे. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण अफ्रिकेसमोर 159 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान काय दक्षिण अफ्रिकेला गाठता आलं नाही.
- Rakesh Thakur
- Updated on: Oct 20, 2024
- 10:47 pm
वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा न्यूझीलंड ठरला मानकरी, पहिल्यांदाच जेतेपदावर नाव कोरलं
वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदावर अखेर न्यूझीलंडने नाव कोरलं आहे. दोनदा जेतेपदाचं स्वप्न भंगल्यानंतर तिसऱ्यांदा जेतेपद मिळवण्यात यश आलं आहे. तर दक्षिण अफ्रिकेला सलग दुसऱ्यांदा पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. न्यूझीलंडने पहिल्यांदाच जेतेपदावर नाव कोरलं आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Oct 20, 2024
- 10:44 pm
SAW vs NZW Toss : दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड कप फायनलमध्ये टॉस जिंकला, न्यूझीलंडची बॅटिंग
South Africa Women vs New Zealand Women Final Toss: वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
- sanjay patil
- Updated on: Oct 20, 2024
- 7:30 pm
Women’s T20 World Cup SA vs NZ : अंतिम सामन्यात अशी असू शकते प्लेइंग 11, पिच रिपोर्ट जाणून घ्या
वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम फेरीत न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आले आहेत. या दोन्ही संघांनी अंतिम फेरीत गाठताना एकच सामना गमावलेला आहे. त्यामुळे या दोन्ही संघात तुल्यबल लढत होणार हे नक्की
- Rakesh Thakur
- Updated on: Oct 19, 2024
- 9:33 pm
Womens T20 WC 2024: न्यूझीलंड-दक्षिण अफ्रिका अंतिम सामना, जाणून घ्या हेड-टू-हेड आकडेवारी
वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या नवव्या पर्वात नवा विजेता मिळणार आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका या संघांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे. या दोन्ही संघानी एकदाही जेतेपद मिळवलेलं नाही. त्यामुळे जेतेपदाबाबत प्रचंड उत्सुकता वाढली आहे. कोण बाजी मारणार? याची चर्चा सुरु आहे. असं असताना कोणता संघ आतापर्यंत वरचढ ठरला ते जाणून घेऊयात
- Rakesh Thakur
- Updated on: Oct 19, 2024
- 8:26 pm
वेस्ट इंडिजला पराभूत करत न्यूझीलंडची अंतिम फेरीत धडक, दक्षिण अफ्रिकेशी होणार सामना
वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या लढतीत न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला धोबीपछाड दिला आहे. विजयासाठी दिलेल्या 128 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ गडगडला आणि 120 धावा करू शकला. अंतिम फेरीत न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात लढत होणार आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Oct 18, 2024
- 10:55 pm
T20 World Cup 2024 : न्यूझीलंडने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी ठेवलं 128 धावांचं आव्हान, कोण मारणार बाजी?
वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडने जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच 20 षटकात 9 गडी गमवून 128 धावा केल्या आणि विजयासाठी 129 धावांचं आव्हान दिलं.
- Rakesh Thakur
- Updated on: Oct 18, 2024
- 9:31 pm
T20 World Cup 2024, NZ vs WI : उपांत्य फेरीत न्यूझीलंड-वेस्ट इंडिज आमनेसामने, असा लागला नाणेफेकीचा कौल
वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील महत्त्वाचा सामना न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात होत आहे. एका बाजूने दक्षिण अफ्रिकेने अंतिम फेरी गाठली आहे. आता दुसरा संघ न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज सामन्यातील निकालानंतर कळेल. या दोन्ही संघांनी साखळी फेरीत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे तूल्यबळ लढत होणार आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Oct 18, 2024
- 7:12 pm
T20 World Cup 2024 : उपांत्य फेरीतील पराभवानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅकग्राथने असं फोडलं खापर, म्हणाली
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेने धडक मारली आहे. बलाढ्य ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत 8 गडी राखून मात दिली. ऑस्ट्रेलियाच्या पराभवामुळे या स्पर्धेतील मोठी स्पर्धक बाहेर गेला आहे. आता दक्षिण अफ्रिका, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यापैकी एक संघ जेतेपद मिळवणार आहे. वेस्ट इंडिजने यापूर्वी जेतेपद मिळवलेलं आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Oct 17, 2024
- 10:54 pm
Womens T20 World Cup : दक्षिण अफ्रिकेची अंतिम फेरीत धडक, ऑस्ट्रेलियाचा हिशेब केला चुकता
वुमन्स टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत करत दक्षिण अफ्रिकेने अंतिम फेरीत धडक मारली आहे. ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 135 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेने 1 गडी गमवून पूर्ण केलं. तसेच या स्पर्धेतील मोठी उलटफेर करत अंतिम सलग दुसऱ्यांदा एन्ट्री मारली आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Oct 17, 2024
- 10:23 pm
T20 World Cup, AUS vs SA : अंतिम फेरीचं तिकीट कोणाला? नाणेफेकीचा कौल दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने
वुमन्स टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या लढतीत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आमनेसामने आले आहेत. दोन्ही संघांचा अंतिम फेरी गाठण्याचा मानस असेल. पण ऑस्ट्रेलियाचा पारडं या स्पर्धेत जड दिसत आहे. दुसरीकडे, दक्षिण अफ्रिका ऑस्ट्रेलियाचा विजय रथ रोखणार का? याकडे लक्ष लागून आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Oct 17, 2024
- 7:09 pm
Icc World Cup 2024 Semi Final Live Streaming : ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका आमनेसामने, कोण पोहचणार फायनलमध्ये?
Australia Women vs South Africa Women 1st Semi Final Live Streaming : ऑस्ट्रेलिया वूमन्स टीम ए तर दक्षिण आफ्रिकेने बी ग्रुपमधून सेमी फायनमध्ये प्रवेश केला आहे. जाणून घ्या हा उपांत्य फेरीतील सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल.
- sanjay patil
- Updated on: Oct 16, 2024
- 11:04 pm