इन्कम टॅक्स बजेट 2024
इन्कम टॅक्स बजेट हा कराशी संबंधित आहे. नोकरदार आणि व्यवसाय करणाऱ्यांच्या उत्पन्नावर सरकार कर आकारते. त्याचा लेखाजोखा इन्कम टॅक्स बजेटमधून मांडला जातो. सध्या नव्या टॅक्स रिजीममध्ये 3 लाखाचं वार्षिक उत्पन्न असलेल्या व्यक्तींना टॅक्स लागू होत नाही. तर 3 ते 6 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना 5 टक्के टॅक्स भरावा लागतो. तर 6 ते 9 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना 10 टक्के आणि 12 लाखाच्यावर उत्पन्न असणाऱ्यांना 15 टक्के कर भरावा लागतो. 12 ते 15 लाखाचं वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना 20 टक्के आणि 15 लाखाहून अधिक उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना 30 टक्के कर भरावा लागतो.