आयपीएल 2025
आयपीएलच्या 18 व्या मोसमात (IPL 2025) एकूण 10 संघ एका ट्रॉफीसाठी आमनेसामने भिडणार आहेत. नेहमीप्रमाणे यंदाही या चमचमत्या ट्रॉफीसाठी 10 संघामध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्हा संघानी प्रत्येकी 5-5 वेळा ट्रॉफीवर नाव कोरलंय. तर काही संघाची प्रतिक्षा गेल्या 17 वर्षांपासून कायम आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात नवा आयपीएल विजेता संघ मिळणार का? याकडे साऱ्यांचंच लक्ष असणार आहे.