राज ठाकरे
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे अध्यक्ष आहेत. राज ठाकरे यांनी 2006 मध्ये शिवसेना पक्षाला सोडचिठ्ठी देत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापना केली होती. राज ठाकरे यांची अनेक आंदोलने गाजली आहेत. त्यांना विधानसभा निवडणुकीच्या पहिल्याच प्रयत्नात 13 आमदार निवडून आणण्यात यश आलं होतं.