सुनीता विल्यम्स
सुनीता लिन विल्यम्स ही भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर आहे. सर्वाधिक काळ अंतराळात राहणारी ती जगातील पहिली महिला ठरली आहे. सुनीता अमेरिकेची अंतराळवीर आहेच. शिवाय ती अमेरिकेच्या नौदलातील अधिकारीही आहे. सुनीता अनेक स्पेस मिशनचा भाग होती. तिने यापूर्वीही आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये काम केलं आहे. सुनीताचे वडील दीपक पंड्या गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील आहेत. दीपक पंड्या हे न्यूरो एनाटोमिस्ट होते. तिची आई उर्सुलाइन बोनी पंड्या एक स्लोव्हेनियाई-अमेरिकन महिला आहे. 1958 मध्ये सुनीताचे वडील अमेरिकेत स्थायिक झाले. 1987मध्ये सुनीताने एक ज्युनिअर कमिशन अधिकारी म्हणून अमेरिकन नौदलात काम सुरू केलं. आता सुनीता तिसऱ्यांदा अंतराळात गेली आहे. यापूर्वी 2006 आणि 2012मध्ये सुनीता अंतराळात गेली होती.