करदाते
कर भरण्यास जे पात्र आहेत, मग ती व्यक्ती असो की संस्था म्हणजे कंपनी त्यांना करदाता म्हटलं जातं. आपल्या उत्पन्नाच्या किंवा संपत्तीच्या वा देवाण-घेवाणीच्या आधारे सरकारला कर देण्यास बाध्य असतात अशांनाही करदाते म्हटलं जातं. व्यक्ती किंवा संस्था जे आयकर अधिनियम 1961च्या तरतुदीच्या अंतर्गत येतात आणि कर भरतात त्यांना करदाते म्हटलं जातं. करदाते गेल्या आर्थिक वर्षाच्या उत्पन्नाचं आकलन आणि गणना करून ITR फॉर्मचा उपयोग करून कर भरतात.