उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्रीही आहेत. 2003 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे (Shiv Sena) पक्षप्रमुख झाले. 28 नोव्हेंबर 2019 रोजी उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. भाजपशी असलेली युती तोडून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. त्यामुळे ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. मात्र, अडीच वर्षच ते राज्याचे मुख्यमंत्री राहिले. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन पक्षात बंड केलं. त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आलं आणि उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावं लागलं. उद्धव ठाकरे हे प्रसिद्ध फोटोग्राफर आहेत. त्यांची एरिअल फोटोग्राफी प्रचंड गाजली. त्यांची "महाराष्ट्र देशा" आणि "पहावा विठ्ठल" ही दोन छायाचित्रांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.