बजेट 2024
आपण प्रत्येकजण आपल्या खर्चाचा पूर्ण तपशील ठेवत असतो. सामान्य माणूस जसा जमाखर्च मांडत असतो. तसाच सरकारही जमाखर्च मांडत असते. त्यालाच बजेट असं म्हटलं जातं. सरकार जेव्हा अर्थसंकल्प मांडत असते तेव्हा त्यात पैसा कुठून जमा करणार आणि कशावर खर्च करणार? याचा ताळेबंद असतो. बजेट हा शब्द मूळचा फ्रेंचमधील आहे. फ्रेंच भाषेत त्याला ‘Bougette’ असं म्हणतात. सामान्य भाषेत बजेटला छोटी बॅगही म्हणतात. म्हणूनच कदाचित अर्थमंत्री बजट सादर करताना संसदेत चमड्याची छोटी बॅग घेऊन दाखल होतात. सध्या मोदी सरकारमधून चमड्याची बॅग गायब झाली आहे. त्याजागी लाल वहीखातं आणि डिजिटल टॅबलेट आलं आहे. भारताच्या बजेटचा इतिहास 1860 पासून सुरू होतो. सुरुवातीला बजेट 28 फेब्रुवारी रोजी संध्यकाळी 5 वाजता सादर व्हायचा. 1999 नंतर हा अर्थसंकल्प सकाळी 11 वाजता सादर करण्याची प्रथा सुरू झाली. 2014पासून बजेटची तारीख बदलण्यात आली. 1 फेब्रुवारी रोजी बजेट (Union Budget) सादर केला जाऊ लागला.