1000 रुपयांची नोट विकली जाते 3 लाखांत… कारण जाणून थक्क व्हालं!
डबल क्वीन हेडवाला ५० पेंस म्हणजे ५० रुपयांचे नाणे गेल्या वर्षी ५५ हजार रुपयांना विकले होते. या नाण्याला त्याच्या किमतीच्या हजारपट मूल्य मिळालं होतं.
नवी दिल्ली : नाणे आणि नोटा दुर्मीळ होत असल्यानं त्यांना किंमत जास्त मिळते. नाणे आणि नोटा एकत्र करण्याचा छंद असणारे विशिष्ट नंबरसाठी जास्त पैसे मोजण्यास तयार असतात. लंडनमध्ये सिरीअल नंबर आणि ऐतिहासिक महत्त्व असणाऱ्या नाणे आणि नोटांसाठी बरीच जास्त किंमत लोकं मोजतात. एका नाण्याची किंमत हजारपट मिळाली आहे. एक हजार रुपयांची नोट तीन लाख रुपयाला विकली गेली. डेलिस्टारच्या रिपोर्टनुसार, नाण्याची अंदाजित किंमत वास्तविक किमतीपासून खूप जास्त आहे.
१० पाउंड म्हणजे एक हजार रुपयांची एएस १७७५ सिरीअल नंबरची प्लास्टिकनोट कुणाजवळ असेल तर त्याची किंमत साडेतीन लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.
प्रसिद्ध इंग्रजी लेखिका जेन ऑस्टन यांचा जन्म १७७५ मध्ये झाला. त्यांचा मृत्यू १८१७ मध्ये झाला. यामुळं या सिनीअर नंबरच्या नोटांना खूप मागणी आहे. जेन ऑस्टिन यांचे प्राईड अँड प्रेज्युडाईस हे प्रसिद्ध साहित्य आहे.
२० पेंस म्हणजे जवळपास २० रुपयांचे नाण्याची किंमत ७५ हजार रुपये आहे. यापूर्वी २० पेंसचे नाणे २०११ मध्ये १५ हजार रुपयांना विकला होता.
डबल क्वीन हेडवाला ५० पेंस म्हणजे ५० रुपयांचे नाणे गेल्या वर्षी ५५ हजार रुपयांना विकले होते. या नाण्याला त्याच्या किमतीच्या हजारपट मूल्य मिळालं होतं.
लंडन ऑलिम्पिकचं २०१२ पूर्वी ५० पेन्सचं नाणं लाँज झालं होतं. या नाण्याची ऑनलाईन मागणी मोठी आहे. या नाण्यासाठी दोन अॅथलेटिक्स आपआपसात लढताना दिसत आहेत. ईबे वेबसाईटवर हे नाणं १ हजार १०० रुपयांना विकलं जात आहे.