अवघ्या दोन फुटांच्या अजीमशी लग्नासाठी तब्बल डझनभर मुलींची रांग, सलमानकडूनही भेटीचा प्रस्ताव!

यूपीमधील शामली येथे राहणारे अवघ्या 2 फुट 3 इंचाचे अजीम मन्सुरी (Azeem Mansuri ) हे लग्न होत नसल्याने खूप नाराज होते, पण आता त्यांच्यासाठी वधूंची रांग लागण्यास सुरुवात झाली आहे.

अवघ्या दोन फुटांच्या अजीमशी लग्नासाठी तब्बल डझनभर मुलींची रांग, सलमानकडूनही भेटीचा प्रस्ताव!
अजीम मन्सुरी
Follow us
| Updated on: Mar 15, 2021 | 4:58 PM

मुंबई : यूपीमधील शामली येथे राहणारे अवघ्या 2 फुट 3 इंचाचे अजीम मन्सुरी (Azeem Mansuri ) हे लग्न होत नसल्याने खूप नाराज होते, पण आता त्यांच्यासाठी वधूंची रांग लागण्यास सुरुवात झाली आहे. त्यांची लग्नाची मागणी आता थेट बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान, तसेच जगभरातील मुलींपर्यंत पोहोचली आहे. खुद्द सलमान खानने त्यांना मुंबईला येण्यासाठी आमंत्रण पाठवले आहे, तेव्हापासून अजीम मन्सुरी खूप खूश आहे. पोलिसांकडे जाऊन लग्न लावून देण्याची मागणी करणारे अजीम मन्सुरींचे नशीब रातोरात चमकले आहे (2 feet tall man Azeem Mansuri  from UP getting lot of marriage proposal after seeking police help).

अजीम मन्सुरीने शामलीचचे सदर कोतवाली गाठले आणि पोलिसांसमोर लग्न लावून द्या, अशी मागणी केली होती. लग्न होत नसल्याने चिंतेत असणाऱ्या अझीम यांनी एसडीएम ते मुख्यमंत्र्यांकडे लग्न लावून देण्यासाठी विनंती केली होती. अत्यंत कमी उंचीमुळे त्यांचे लग्न जमत नव्हते. यामुळे ते खूप नाराज होते. या विषयी बोलताना अझीम मन्सूरी म्हणाले की, बर्‍याच वेळा त्यांच्या लग्नासाठी स्थळे आली होती. परंतु, उंची कमी असल्यामुळे कोणतीही बोलणी पुढे सरकू शकली नाहीत.

लग्नासाठी वधूंची रंग!

अजीमचे कुटुंबीय सांगतात की, जेव्हापासून त्यांच्याबद्दल बातम्या माध्यमात आल्या आहेत तेव्हापासूनच त्यांच्या विवाहसाठी स्थळे येण्यास सुरुवात झाली आहे. बर्‍याच मुलींकडून, त्यांच्या कुटुंबियांकडून कॉल येत आहेत. त्याचवेळी अझीम मन्सुरी म्हणतात की, सलमानबरोबरच चित्रपट विश्वातील इतर कलाकारदेखील त्याला भेटायला बोलवत आहे, यासाठी त्यांना सतत फोन येत आहेत. सलमान खानने स्वत: त्यांना मुंबईत भेटण्यासाठी बोलावले आहे. आपल्याला थेट सलमानकडून निमंत्रण मिळाले, यामुळे ते खूप खुश आहेत (2 feet tall man Azeem Mansuri  from UP getting lot of marriage proposal after seeking police help).

कोण आहेत अजीम मन्सुरी?

अझीम त्यांच्या सहा भावंडांपैकी सर्वात धाकते आहेत. त्याच्या उंचीमुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. कारण, लोक त्यांच्या उंचीची नेहमीच चेष्टा करतात. शाळेतही त्यांना इतका त्रास झाला की, त्यांनी शिक्षण सोडले आणि व्यवसायात प्रवेश केला. त्यानंतरच त्यांनी एक कॉस्मेटिक शॉप सुरु करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या भावासोबत तिथे काम करण्यास सुरुवात केली. जेव्हा ते 21 वर्षांचे होते, तेव्हापासून ते वधूचा शोध घेत होते.

उत्तर प्रदेशचे रहिवासी असलेले 26 वर्षीय अजीम मन्सुरी यांना लवकरात लवकर लग्न करायचे आहे. या तणावामुळे त्यांना रात्रभर झोप येत नाही. घरातील लोक प्रयत्न करत नाहीत, म्हणून त्यांनी पोलीस ठाण्यात अर्ज केला आहे, त्यांनी केवळ अर्ज केला नाही तर, ‘इतक्या’ वेळात त्यांचे लग्न करावे, अशी मागणी देखील केली आहे. वर्तमानपत्रे, टीव्ही न्यूज चॅनेल्समध्येही अजिनच्या लग्नाची बातमीची चर्चा सुरू आहे.

(2 feet tall man Azeem Mansuri  from UP getting lot of marriage proposal after seeking police help)

हेही वाचा :

Bengaluru Zomato case | दोघांपैकी कोण खरं? बंगळुरु झोमॅटो प्रकरणाचा ‘हा’ व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल, एकदा पाहाच

VIDEO : मनमोहक समुद्र किनारा, धनश्रीचा डान्स, युजवेंद्र चहलचेही ठुमके, पंजाबी गाण्यावर दिग्गज थिरकले

(2 feet tall man Azeem Mansuri  from UP getting lot of marriage proposal after seeking police help)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.