ती 52 वर्षांची आणि तो 21 वर्षांचा! सनई संगे झडे चौघडा, डोईवरती पडती अक्षता…
कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "और इनकी वरमाला होते ही कलियुग का अंतिम चरण प्रारम्भ हुआ……"
प्रेमात सगळंच योग्य असतं असं म्हटलं जातं आणि प्रेम खरं असेल तर लोकांना काही फरक पडत नाही. एखादी व्यक्ती प्रेमात पडली तर वय आणि जात बघत नाही. असे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, ज्यात प्रेम करणाऱ्यांच्या वयात खूप फरक आहे, पण त्यांना याची चिंता नाही. ही बातमी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. सोशल मीडियावर एक व्हिडिओही व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल. एका मुलाने 52 वर्षीय महिलेशी लग्न केले आणि म्हणतो प्रेमात वय नसतं.
इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक 21 वर्षांचा मुलगा लग्नाच्या स्टेजवर उभा आहे आणि त्याच्या मागे एक खुर्ची दिसत आहे, जी सहसा फक्त लग्नसमारंभातच पाहायला मिळते.
दोघांनीही गळ्यात हार घातले आहेत. त्या मुलाला कुणीतरी विचारलं की तुम्ही दोघं विवाहित आहात का? तेव्हा मुलाने “हो” असे उत्तर दिले.
रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओतील पुरुषाने मुलाला त्याच्या वयाबद्दल विचारले असता त्याने सांगितले की, तो 21 वर्षांचा आहे आणि ज्या महिलेशी त्याने लग्न केले आहे ती 52 वर्षांची आहे.
तेव्हा समोर उभ्या असलेल्या लोकांनी विचारलं की, तू हे बरोबर केलंस का, तर त्या मुलानं उत्तर दिलं, ‘प्रेमाला वय नसतं. प्रेम कधीही होऊ शकतं”.
व्हिडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्या व्यक्तीने विचारले की, तुम्ही लोक या लग्नामुळे खूश आहात का, तर महिलेने सांगितले की हो, आम्ही दोघेही खुश आहोत. माझा त्यांच्यावर माझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे. कारण मी त्यांना तीन वर्षांपासून ओळखते आहे.
यावर तो मुलगाही म्हणाला, ‘प्रेमाला वय नसतं,त्यात फक्त हृदय दिसतं.” फेसबुकवर हा व्हिडिओ पोस्ट होताच तो झपाट्याने व्हायरल झाला.
अमित चतुर्वेदी नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “और इनकी वरमाला होते ही कलियुग का अंतिम चरण प्रारम्भ हुआ……”