Video : सेल्फी विकून झाला करोडपती! वाचा, इंडोनेशियन मुलाची यशोगाथा
सेल्फी (Selfies) विकून करोडपती (Millionaire) होऊ शकतो का? याचा एकदा विचार केला तर आश्चर्य वाटू शकतं. पण हे खरं आहे. या 22 वर्षांच्या मुलानं सेल्फी विकून £733,500 (7 कोटींहून अधिक) पैसे कमावले आहेत.
सेल्फी (Selfies) विकून करोडपती (Millionaire) होऊ शकतो का? याचा एकदा विचार केला तर आश्चर्य वाटू शकतं. पण हे खरं आहे. या 22 वर्षांच्या मुलानं सेल्फी विकून £733,500 (7 कोटींहून अधिक) पैसे कमावले आहेत. ‘डेली स्टार’नं इंडोनेशिया(Indonesia)तल्या या मुलाची यशोगाथा प्रकाशित केलीय. अशाप्रकारे पैसे कमावता येवू शकतात, याची खुद्द या मुलालाही कल्पना नव्हती. मात्र त्यानं प्रयत्न केले आणि त्यात त्याला यश मिळालं. आता हे सगळं कसं घडलं, हा मुलगा सेल्फी घेऊन करोडपती कसा झाला? तर चला पाहू या…
बनवला व्हिडिओ प्रोजेक्ट
सुल्तान गुस्ताफ अल घोजाली (Ghozali Ghozalu) असं या 22 वर्षीय मुलाचं नाव आहे. तो कॉम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी आहे. सुल्ताननं त्याच्या 18 वर्षांच्या वयाचे 1000 सेल्फी घेतले. ‘घोजाली एव्हरीडे’ या प्रोजेक्टच्या नावानं त्यानं या सेल्फीचा व्हिडिओ बनवला. सुरुवातीला लोकांना गंमत वाटेल या विचारानं त्यानं हा व्हिडिओ प्रोजेक्ट बनवला. पण हे प्रकल्प आणि त्याची चित्रे NFT (NFT: Non-Fungible Token)नं विकत घेतली.
NFTद्वारे विक्री
NFT हा एक डिजिटल प्रकार आहे, जे ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरून विकत घेतले जाते. माहितीनुसार, विशेष प्लॅटफॉर्मवर क्रिप्टोकरन्सी आणि एनएफटीची खरेदी आणि विक्री केली जाते.
‘मला वाटलं नव्हतं…’
एनएफटी कलेक्टर्सनी घोजालीची ही छायाचित्रं विकत घेतली. घोजालीनं NFT लिलाव साइट OpenSeaवर क्रिप्टोकरन्सीसाठी त्याचे सेल्फी विकले. गोजाली म्हणतो, की ‘काई माझा सेल्फी विकत घेतील, असं मला कधीच वाटलं नव्हतं. तेव्हा त्याची किंमत फक्त 3 डॉलर ठेवण्यात आली होती. पण जेव्हा एका सेलिब्रिटी शेफनं त्या फोटोंना विकत घेतलं आणि सोशल मीडियावर त्यांचं प्रमोशन केलं तेव्हा 400हून अधिक लोकांनी हे फोटो विकत घेतले. घोजालीनं आतापर्यंत अनेक कोटींची कमाई केलीय. मात्र त्यानं ही माहिती कुटुंबीयांना दिली नाही.
my goal of taking pictures of myself for 5 years is just for this video
and in the future for this year hopefully I will graduate from college and be able to take my graduation photo, it will be a cool triphttps://t.co/sBdKmtzvXe
— Ghozali_Ghozalu (@Ghozali_Ghozalu) January 12, 2022
41 हजार फॉलोअर्स
गोजालीच्या ट्विटरवर केवळ 41 हजार फॉलोअर्स आहेत, परंतु जेव्हा जेव्हा लिलाव होणार असतो, तेव्हा तो सतत त्याचे अपडेट्स शेअर करत असतो. नुकताच या 22 वर्षीय विद्यार्थ्यानं आयकरही भरला आहे.
NFT म्हणजे काय?
Non-fungible token (NFT) पहिल्यांदा 2014मध्ये समोर आलं. NFT हा वेगळ्या प्रकारचा अपरिवर्तनीय डेटा आहे. जे खऱ्याखुऱ्या जगातही दिसतो. यामध्ये लोक क्रिप्टोकरन्सीचा वापर करून मूळ कॉपी डिजिटल आर्टची खरेदी आणि विक्री करतात. प्रत्येक डिजिटल कलेचा एक युनिक कोड असतो.