OMG : 33 वेळा नियमांची केली ऐशी की तैशी! या तरुणीमुळे पोलिसांना मनस्ताप, ट्रॅफिक नियम तोडल्याने ठोठावले 24 लाखांचे चालान

Traffic Rules News : आता मंडळी काय म्हणावं या कार्टीला, नुसता मनस्ताप दिलाय या माऊलीनं वाहतूक पोलिसांना. एकदा नाही तर 33 वेळा नियमांची ऐशी की तैशी केली.

OMG : 33 वेळा नियमांची केली ऐशी की तैशी! या तरुणीमुळे पोलिसांना मनस्ताप, ट्रॅफिक नियम तोडल्याने ठोठावले 24 लाखांचे चालान
तब्बल 33 वेळा तोडले वाहतूक नियम Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 09, 2022 | 2:23 PM

आता मंडळी काय म्हणावं या कार्टीला, नुसता मनस्ताप दिलाय या माऊलीनं वाहतूक पोलिसांना (Traffic Police). एकदा नाही तर 33 वेळा नियमांची ऐशी की तैशी (Broke the Traffic Rules) केली. तुम्ही म्हणाल असं कुठं असतं व्हय. एवढी संधी देऊन तर ढ माणूस पण सुधारता. तुमचं म्हणणं एकदम पटण्यासारखं आहे. पण ही बया काही केल्या चूक सुधरायला तयारच नव्हती. तिच्या या बेदरकार वेगाने रस्यावरुन गाडी चालवण्याच्या, नाही हो गाडी उडवण्याच्या हौसेने तिला तब्बल 24 लाखांचा दंड (Police Challan) ही सोसावा लागला. पण ही तरुणी काही सुधारण्याचे नाव घेईना. इतक्या वेळा समजावून सांगूनही, तिला सुधारण्याची तमाम प्रयत्न या बहाद्दर मुलीनं पार हाणून पाडले. रस्त्यावर बेदरकार वेगात गाडी चालवण्याची तिच्या वेडानं पोलिसही चक्रावले. समज देऊनही सुधारणा होत नसल्याने मग पोलिसांनी तिला दीड वर्ष वाहन चालविण्यासही बंदी घातली होती. मुलीने बिनदिक्कतपणे गाडी चालवल्याची सर्व प्रकरणे रस्त्यावरील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. ही बातमी सध्या ट्रेडिंग होत आहे.

नियम तोडण्याचा विक्रम

अॅन मेरी कॅश असे या महिलेचे नाव असून ती मूळची कार्डिफ (साऊथ वेल्स), यूकेची रहिवाशी आहे. द सनच्या रिपोर्टनेही या सर्व बातम्यांना दुजोरा दिला आहे. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी अॅन मेरी कॅशला 33 वेळा दंड ठोठावला आहे. कारण तिने लागोपाठ अनेक वाहतूक नियम मोडले. तीन महिन्यांत 33 वेळा या मुलीच्या वेगाने धावण्याच्या घटना घडल्या आहेत. तीन महिन्यांत अनेक वेळा ओव्हर स्पीडिंगसाठी तिचे पोलिसांनी चालान कापले. शिवाय, एकाच दिवसात 8 वेळा ओव्हर स्पीड ड्रायव्हिंगसाठी चालान कापण्याचा विक्रम पण याच तरुणीच्या नावे आहे. नियम तोडल्याने ती आरोपी ठरली आणि तिला ब्रिटनच्या वाहतूक नियमांनुसार, पोलिसांनी भारतीय चलनात सुमारे 24 लाख 35 हजारांचा दंड ठोठावला. या पठ्ठीने प्रत्येक वेळा दंडाची रक्कम भरली आणि पुन्हा तीच चूक वारंवार केली. त्यामुळे तिचा परवाना दीड वर्षांसाठी पोलिसांनी काढून घेतला.

सर्व प्रकार सीसीटीव्ही कैद

या तरुणीने बिनदिक्कतपणे गाडी चालवल्याची सर्व प्रकार रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. यातील सर्वाधिक प्रकरणे गेल्या वर्षी ऑगस्ट ते ऑक्टोबरदरम्यान आढळून आली आहेत. अॅन मेरी कॅशची कार, जी वारंवार इनव्हॉइस केली जात होती, तिच्या प्लेटवर आयर्लंडची नंबर प्लेट होती. बातमीनुसार, एका दिवसात ओव्हर स्पीडिंगसाठी या मुलीचे 8 वेळा चालान कापावे लागले होते. तेव्हा मेरी कॅश कार्डिफमध्येच हजर होती. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अॅन मेरी कॅश पोलिसांना सहज सापडली असे झाले नाही.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी कार नंबर केलासार्वजनिक

ही तरुणी सीसीटीव्ही आधारे ही सापडत नसल्याने तीचा शोध घेण्यासाठी पोलीस विभागाला खूप संघर्ष करावा लागला. अॅन मेरी कॅशच्या कारची नंबर प्लेट पोलिसांना सार्वजनिक करावी लागली. त्यानंतर पोलिस अॅन मेरी कॅशपर्यंत पोहोचू शकले. जेव्हा आरोपी तरुणीला साऊथ वेल्स पोलिसांनी पकडले आणि चौकशी सुरू केली. त्यामुळे बेदरकार वेगाने कार रस्त्यांवर चालवण्याचा गुन्हा तीने स्वीकारला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.