Viral Video : 24 कॅरेट सोन्याचं आईस्क्रीम कधी खाल्लंय का? कुठे आणि किती रुपयांना मिळतं? चला पाहू या…
आईस्क्रीम(Ice-Cream)... तोंडाला पाणी सुटलं ना? तुम्हालाही जर वेगवेगळ्या प्रकारचे आइस्क्रीम आवडत असतील तर एक नवं ठिकाण आम्ही घेऊन आलो आहोत. तर चला हैदराबाद(Hyderabad)ला...
आईस्क्रीम(Ice-Cream)… तोंडाला पाणी सुटलं ना? सर्वांनाच हा प्रकार आवडीचा.. पण आता तर थंडी आहे. तुम्ही म्हणाल, ही काही आईस्क्रीमची वेळ नाही. मात्र हौशी आणि चवीनं खाणाऱ्यांना कोणताही ऋतू लागत नाही. तुम्हालाही जर वेगवेगळ्या प्रकारचे आइस्क्रीम आवडत असतील तर एक नवं ठिकाण आम्ही घेऊन आलो आहोत. तर चला हैदराबाद(Hyderabad)ला…
आइस्क्रीमचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट
इथं तुम्हाला असं आइस्क्रीम मिळेल, जे तुम्ही आजपर्यंत जगात कुठंही पाहिलं नसेल किंवा खाल्लं नसेल. होय, सोन्याचं आईस्क्रीम इथं उपलब्ध आहे. तेही 24 कॅरेट सोन्याचं… अभिनव जेसवानी या फूड ब्लॉगरनं या आइस्क्रीमचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. बघता बघता हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या आइस्क्रीमचं नाव मिनी मिडास असं ठेवण्यात आलं असून ते हैदराबादमधल्या ह्युबर आणि हॉली कॅफेमध्ये उपलब्ध आहे.
सोनेरी शंकूमध्ये सोन्याचं अस्तर
व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हे गोल्ड प्लेटेड आईस्क्रीम बनवताना दिसत आहे. यामध्ये तो माणूस चॉकलेट कोनमध्ये आईस्क्रीम टाकतो. यानंतर तो त्यावर सोन्याचा वर्ख ठेवतो आणि त्यावर चेरी टाकतो. त्यात एक खाण्यायोग्य सोनेरी गोळा आहे, ज्यामध्ये सोनेरी मलई दिलीय. त्यानंतर ते सोन्याच्या फॉइलनं झाकलं जातं. अभिनव जेसवानीनं जस्ट नागपूर थिंग्स नावाच्या त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि लिहिलं आहे, की हे 24K गोल्ड आइस्क्रीम हैदराबादमधल्या ह्युबर आणि हॉली नावाच्या कॅफेतलं आहे. आजपर्यंत मी असं आईस्क्रीम कुठंही खाल्लेलं नाही. तुम्ही पण एकदा नक्की करून, खाऊन बघा.
View this post on Instagram
किंमत 500पेक्षा जास्त!
या आईस्क्रीमची किंमत 500 रुपये आहे. याशिवाय त्यावर अतिरिक्त कर आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओला 18 हजारांहून अधिक वेळा पाहण्यात आलंय. तर अनेकांकडून लाइक्स आणि शेकडो कमेंट्स आल्या आहेत. अनेकांनी याला स्वादिष्ट म्हटलंय. तर काहींनी हे आईस्क्रीम खायला आवडेल, असंही नमूद केलं आहे. तर काहींनी आईस्क्रीमची किंमत खूपच जास्त असल्याचं म्हटलंय.