Viral Kid skating : 3 वर्षाच्या चिमुकल्याचं परफेक्ट स्केटिंग! ‘हा’ Video पाहतच राहाल

Kid skating video : सध्या सोशल मीडिया(Social Media)वर एक व्हिडिओ (Video) खूप व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये फक्त 3 वर्षांचा मुलगा परफेक्ट स्केटिंग (Skating)करताना दिसत आहे. त्याला पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर नक्कीच विश्वास बसणार नाही.

Viral Kid skating : 3 वर्षाच्या चिमुकल्याचं परफेक्ट स्केटिंग! 'हा' Video पाहतच राहाल
परफेक्ट स्केटिंग करताना तीन वर्षांचा चिमुकला
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 5:52 PM

Kid skating video : स्केटिंग हा एक अवघड आणि कौशल्याचा खेळ आहे. त्यासाठी कठोर परिश्रम तसेच युक्त्या आवश्यक आहेत. स्केटिंग करताना तुमचे दोन्ही पाय किती दूर ठेवावेत, गुडघे किती वाकवावेत आणि नियंत्रण कसं ठेवावं हे शिकायला हवं, नाहीतर तुमचा थोडासा तोलही जाईल आणि तुम्ही खाली पडाल. स्केटिंग करताना समतोल राखणं सर्वात महत्त्वाचं असतं, कारण हीच गोष्ट तुम्हाला समोरून पडण्यापासून वाचवते. जगात अशी मुलं आहेत जी स्केटिंग करतात आणि तेही अतिशय चांगल्या पद्धतीनं. पण तुम्ही क्वचितच 3 वर्षाच्या मुलाला स्केटिंग करताना पाहिलं असेल. सहसा, इतक्या लहान वयात मुलांना नीट धावता येत नाही, त्यामुळे स्केटिंग करणं तर दूरच. पण सध्या सोशल मीडिया(Social Media)वर एक व्हिडिओ (Video) खूप व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये फक्त 3 वर्षांचा मुलगा परफेक्ट स्केटिंग (Skating)करताना दिसत आहे. त्याला पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर नक्कीच विश्वास बसणार नाही.

मोठ्यांना फुटेल घाम

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की मुलानं स्केटबोर्ड पकडला आहे आणि तो एका उंच जागेवर ठेवतो, नंतर तिथं चढण्याचा प्रयत्न करतो. शेवटी जेव्हा तो वर चढतो, त्यानंतर तो स्केटबोर्ड काठावर ठेवतो आणि त्यावर चढतो आणि खाली सरकतो आणि मस्त मजेत स्केटिंग करत राहतो. त्याचा अप्रतिम तोल बघून मग इतरांनाही घाम फुटेल.

ट्विटर प्लॅटफॉर्मवर शेअर

ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @buitengebieden_ या नावानं हा जबरदस्त व्हिडिओ शेअर करण्यात आला असून कॅप्शनमध्ये स्केटिंग करणाऱ्या मुलाचं वय अवघं 3 वर्षे असल्याचं सांगण्यात आलं आहे. अवघ्या 50 सेकंदांच्या या व्हिडिओला आतापर्यंत 1 मिलियन म्हणजेच 10 लाख व्ह्यूज मिळाले आहेत, तर 28 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइकदेखील केलं आहे. त्याचबरोबर व्हिडिओ पाहून अनेकांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. एका यूझरनं लिहिलं आहे, की, हे मूल पूर्णपणे वेगळ्या लेव्हलचं आहे, तर दुसऱ्या यूझरनं हे मूल अप्रतिम असल्याची कमेंट केली आहे.

Viral : तुम्हाला फोडता येतील का असे फुगे? 20 मिलियनहून अधिकवेळा पाहिला गेलाय ‘हा’ 10 सेकंदांचा Video

Animal Jugaad : शेळी आणि गाढवाचा अनोखा जुगाड? टीमवर्क पाहून म्हणाल, कोणतंही काम अवघड नाही! Video Viral

Viral : दिवसभर मास्क घालून दमछाक होतेय? कोरियन कंपनीनं बनवलाय Unique Mask!

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.