AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Halamithi Habibo गाणं तर ऐकलं असेलच, आता Video पाहा, पण ‘विजय’चा नाही, तर…

Arabic Kuthu - Halamithi Habibo : 63 वर्षीय 'डान्सिंग दादी' रवी बाला शर्मा यांनी आपली नृत्याची आवड कायम ठेवली आहे. सध्या डान्सिंग दादीचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्याला यूझर्सची पसंती मिळत आहे.

Halamithi Habibo गाणं तर ऐकलं असेलच, आता Video पाहा, पण 'विजय'चा नाही, तर...
अरबी कुथू हलमिती हबीबो या ट्रेंडिंग गाण्यावर थिरकताना रवी बाला शर्माImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 24, 2022 | 4:49 PM
Share

Arabic Kuthu – Halamithi Habibo : वय हा फक्त एक आकडा असतो. मनात उत्साह आणि काहीतरी करण्याची जिद्द असेल तर वयाच्या 60व्या वर्षीही माणूस काय करू शकत नाही. आता 63 वर्षीय ‘डान्सिंग दादी’ रवी बाला शर्मा यांनाच पाहा. वयाच्या या टप्प्यावरही त्यांनी आपली नृत्याची आवड कायम ठेवली आहे. सध्या डान्सिंग दादीचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्याला यूझर्सची पसंती मिळत आहे. व्हायरल (Viral) व्हिडिओमध्ये, रवी बाला सुपरस्टार विजयच्या (Thalapathy Vijay) आगामी चित्रपट बीस्टमधील (Beast) अरबी कुथू हलमिती हबीबो या ट्रेंडिंग गाण्यावर थिरकताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, देसी दादी सुपरस्टार विजय आणि पूजा हेगडे असलेल्या ‘हलामिथी हबीबो’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. डान्सिंग दादीने या गाण्याच्या हुक स्टेप्स खूप छान केल्या आहेत.

इन्स्टाग्रामवर अपलोड

स्वतः रवी बालाने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, ‘जेव्हा तुम्हाला फक्त आणि फक्त डान्स करायला आवडते!!! हे गाणे तुमच्या आतल्या तमिळ चाहत्याला बाहेर आणण्यासाठी एक ट्रीट आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण त्यांच्या अभिनयाचे, डान्सचे कौतुक करत आहेत. कोणी डान्सिंग दादीला अप्रतिम म्हणत आहे, तर कोणी त्यांच्या डान्स मूव्ह्सला उत्कृष्ट म्हणत आहे.

‘कलाकाराला वय नसते’

15 मार्च रोजी इन्स्टाग्रामवर अपलोड केलेल्या या व्हिडिओला 10 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे, तर 1 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. त्याचबरोबर या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर एक यूझर म्हणतो, ‘कलाकाराला वय नसते. तुम्ही खूप सुंदर परफॉर्मन्स दिला.’ त्याचवेळी दुसर्‍या यूझरने कमेंट करत लिहिले, ‘मला तुम्हाला भेटायचे आहे आजी, तुम्ही आम्हा सर्वांसाठी प्रेरणा आहात. मन जिंकलं.

मुलगी आणि मुलगा करतात मदत

डान्सिंग दादीने तिचा पहिला इन्स्टाग्राम व्हिडिओ ऑनलाइन स्पर्धेसाठी बनवला होता, जो यूझर्सना खूप आवडला होता. तेव्हापासून त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. रवी बाला अजूनही तंत्रज्ञानात नवशिक्या आहेत, त्यामुळे त्यांची मुलगी आणि मुलगा त्यांना व्हिडिओ शूट करण्यापासून ते गाणे आणि वेशभूषेपर्यंत सर्व गोष्टींमध्ये मदत करतात.

आणखी वाचा :

Video : Miamiच्या रस्त्यावर भारतीय तरुणाच्या जबरदस्त Dance moves, परदेशी तरुणींनाही लावलं वेड

Sindhudurg : गोमूच्या खेळावरही पुष्पाचा Fever; हौशी कलाकार Srivalli गाण्यावर धरतायत ठेका!

विजेशिवाय चालते ‘ही’ Treadmill! आता घरीच व्यायाम करा आणि पैसेही वाचवा, Jugaad Video viral

भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.