Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही 7 भारतीय रेस्टॉरंट ठरली वर्ल्ड टॉप 150 मोस्ट लेजेंडरी, मुंबईच्या रामाश्रयचा कितवा नंबर पाहा

टॉप 150 यादीतील हे फूड जॉइंट्स, 'केवळ जेवण घेण्याची ठिकाणे नसून खवय्यांसाठी जणू खाद्य संस्कृतीची ऐतिहासिक तीर्थस्तळे बनली आहेत.

ही 7 भारतीय रेस्टॉरंट ठरली वर्ल्ड टॉप 150 मोस्ट लेजेंडरी, मुंबईच्या रामाश्रयचा कितवा नंबर पाहा
aalu parathaImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jun 25, 2023 | 5:56 PM

दिल्ली : तोंडाला पाणी सुटणारे खमंग आणि चविष्ठ डीशेश असणाऱ्या वर्ल्ड मोस्ट लिजेंडरी रेस्टॉरंटची ( World Most Legendary Restaurants ) एक यादीच जाहीर झाली आहे. त्यात हरियाणाच्या मुरथल येथील अमरिक सुखदेव ढाबा या शाकाहारी रेस्टॉरंटसह भारतातील सात रेस्टॉरंटचा टॉप 150 रेस्टॉरंटच्या यादीत समावेश झाला आहे. एक्सपिरिएन्शल ट्रॅव्हल ऑनलाईन गाईड टेस्ट एटलासने ( Taste Atlas ) ही यादी जाहीर केली आहे. त्यात मुंबईतील साऊथ इंडीयन पदार्थांसाठी प्रसिध्द असलेल्या माटुंगा येथील राम आश्रय ( Ram Ashraya ) रेस्टॉरंटची देखील निवड झाली आहे.

लखनवी टुंडे कबाबी

या वर्ल्ड मोस्ट लिजेंडरी रेस्टॉरंटमध्ये 11 व्या क्रमांकावर भारतातील कोझीकोडे येथील ऐतिहासिक पॅरागॉन रेस्टॉरंटचा समावेश झाला आहे. तर 12 व्या क्रमांकावर लखनऊच्या टुंडे कबाबी या रेस्टॉरंटचा क्रमांक आला आहे. त्यापाठोपाठ 17 व्या नंबरावर कोलकाता येथील पीटर कॅटचा समावेश झाला आहे. तर 23 व्या क्रमांकावर हरियाणाच्या मुरथलच्या आमरिक सुखदेव रेस्टॉरंटने नंबर पटकवला आहे. तर 39 व्या क्रमांकावर बंगळुरुच्या मवल्ली टीफीन रुम्स या रेस्टॉरंटचा नंबर आला आहे. तर 87 क्रमांकावर दिल्लीच्या करीम या रेस्टॉरंटचा तर मुंबईच्या माटुंग्यातील दाक्षिणात्य पदार्थासाठी प्रसिद्ध असणाऱ्या रामाश्रयचा 112 वा नंबर लागला आहे.

पॅरागॉन रेस्टॉरंटची बिर्याणी 

यादीत 11 व्या क्रमांकावर निवड झालेल्या पॅरागॉन रेस्टॉरंटची साल 1939 मध्ये केरळच्या कोझीकोडे शहरात स्थापना झाली होती. येथील बिर्याणी ही आयकॉनिक डीश आहे. उच्च प्रतीचा तांदुळ, मांस आणि मसाल्यांचे मिश्रण असलेली येथील बिर्याणीची चव जीभेवर रेंगाळणारी आहे. तर यादीत बाराव्या स्थान मिळालेले लखनऊचे पारंपारिक ‘टुंडे कबाब’ अर्थात मटण कबाबसाठी विख्यात आहे. येथील कबाबचे चाहते जगभरात पसरलेले आहेत.

अमरिक सुखदेवचा आलू पराठा

हरियाणाच्या मुरथलचा अमरिक सुखदेव हा खरे तर दिल्ली ते अंबाला महामार्गावरील ढाबा होता. त्याचे आता अमरिक सुखदेव रेस्टॉरंट म्हणून नाव झाले आहे. याचा जगातील टॉप 150 यादीत 23 वा क्रमांक आला आहे. या शाकाहारी ढाब्यातील आलु पराठा लाजवाब म्हटला जातो. लोण्याच्या तुकड्यांसह हा आलू पराठा घरगुती लोणची आणि मिरचीसह सर्व्ह केला जातो. ही येथील आलू पराठा जगप्रसिद्ध आहे.

राम आश्रयच्या साऊथ इंडीयन डीशेस 

मुंबईतील माटुंगा येथील साऊथ इंडियन रेस्टॉरंट राम आश्रय हे प्रचंड लोकप्रिय रेस्टॉरंट आहे. येथे तुम्हाला दाक्षिणात्य पदार्थाची रेलचेल पहायला मिळेल. हे पदार्थ खास पदार्थ केळीच्या पानात सर्व्ह केले जातात. या ठिकाणी सकाळी नाश्ता करण्यासाठी तुम्हाला थोडी वाट पाहावी लागते. आता नवीन राम आश्रय देखील उभारण्यात आले आहे. येथील इडली, डोसा आणि सांभार आदी पदार्थांची चव जिभेवर रेंगाळणारी आहे.

या भारतीय सात रेस्टॉरंटची निवड रॅंकनूसार पाहा

रॅंक 11 : कोझीकोडे येथील ऐतिहासिक पॅरागॉन रेस्टॉरंट

रॅंक 12 : लखनऊ येथील टुंडे कबाबी

रॅंक 17 : कोलकाता येथील पीटर कॅट

रॅंक 23 : हरीयाणा- मुरुथलचा आमरिक सुखदेव ढाबा

रॅंक 39 : बंगळुरु येथील मवल्ली टीफीन रुम्स

रॅंक 87 : दिल्लीचा करिम रेस्टॉरंट

रॅंक 112 : मुंबई-माटुंगा येथील रामाश्रय

कार्यकर्त्यांची रेलचेल अन् संभाषणासाठी वापरायला पोलिसांचे मोबाईल..
कार्यकर्त्यांची रेलचेल अन् संभाषणासाठी वापरायला पोलिसांचे मोबाईल...
मी दुर्लक्ष केलं...कामराने उलडवलेल्या खिल्लीनंतर शिंदे स्पष्टच म्हणाले
मी दुर्लक्ष केलं...कामराने उलडवलेल्या खिल्लीनंतर शिंदे स्पष्टच म्हणाले.
कामराची माफी नाहीच...शिवसैनिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर पहिलं ट्वीट काय?
कामराची माफी नाहीच...शिवसैनिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर पहिलं ट्वीट काय?.
शिव्या देतो माझ्या छातीला..,माजी नगरसेवकाला महिला कार्यकर्त्याकडून चोप
शिव्या देतो माझ्या छातीला..,माजी नगरसेवकाला महिला कार्यकर्त्याकडून चोप.
धारावीत ब्लास्ट, 10 हून अधिक सिलिंडरचा भीषण स्फोट, क्षणार्धात भस्मसात
धारावीत ब्लास्ट, 10 हून अधिक सिलिंडरचा भीषण स्फोट, क्षणार्धात भस्मसात.
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.