Video : वय वर्ष 71 असलेल्या ‘श्रावणबाळा’चा 105 वर्षांच्या आईला खांद्यावर घेत शिर्डी पायी प्रवास
71 वर्षांचे बबनराव हे रिक्षा चालक आहे. 45 वर्षांपासून ते रिक्षा चालवतात. ते 18 वेळा वारीला गेले आहेत.
मुंबई : मुंबईतून पायी शिर्डीला जाणाऱ्यांची संख्या कमी नाही. अनेक मंडळांच्या शिर्डीसाठी (Shirdi) पदयात्रा निघत असतात. पण नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये एकानं आपल्या आईला खांद्यावर घेऊन शिर्डी पायी प्रवास केलाय. आईला खांद्यावर घेऊन पायी चालणाऱ्या या श्रावणबाळाचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झालाय. अनवाणी आईला डोक्यावरुन घेऊन चालणाऱ्या या श्रावणबाळाचं वय तब्बल 71 वर्ष आहे. या वयात काहींना धड चालताही येत नाही. त्या वयात या मुलानं आपल्या 105 वर्षांच्या आईला खांद्यावर बसवलं आणि शिर्डीची वाट धरली. कोपरगाव ते शिर्डी (Kopargaon to Shirdi) असा पायी प्रवास या मुलानं केला आहे. मराठी मीम या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. रात्रीच्या वेळेस आईला खांद्यावर घेऊन या मुलानं रस्तानं शिर्डीसाठीची वाट धरल्याचं व्हिडीओमध्ये दिसून आलंय.
पाहा व्हिडीओ :
हे सुद्धा वाचाView this post on Instagram
कोपरगावहून शिर्डीला पायी चालत जाणाऱ्या या इसमाचं नाव आहे बबनराव जोगदंड.. बबनरावांनी आपली आई जयाबाई यांना खांद्यावर घेतलं आणि शिर्डीची वाट धरली. कोपरगाव ते शिर्डी असा त्यांनी हा प्रवास केला.
कोण आहेत बबनराव?
71 वर्षांचे बबनराव हे रिक्षा चालक आहे. 45 वर्षांपासून ते रिक्षा चालवतात. ते 18 वेळा वारीला गेले आहेत. दरवर्षी ते मुंबादेवीच्या साईगाव पालखीला पायी जात असत. एकदा आईलाही घेऊन जावं, असा विचार त्यांच्या मनात नेहमी यायचा. मात्र एकदा देवळात दर्शनासाठी गेले असता त्यांना आपण आईला खांद्यावर घेऊन शिर्डीला जाऊ, असं निश्चित केलं. त्यानुसार त्यांनी हा पायी प्रवास केला आणि हा प्रवास गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात तुफान व्हायरल झालाय.
शेकडोंची पायी वारी
दरवर्षी न चुकता अनेकजण शिर्डीला जात असतात. कोरोनामुळे अनेकांना शिर्डीला जाणं शक्य झालं नव्हतं. मात्र त्यानंतर आता पुन्हा पायी शिर्डीला जाण्यासाठी यात्रा निघाल्या होत्या.