Dinosaur | चीनमध्ये आढळले डायनासॉरचे भ्रूण’, 7 कोटी वर्षांपूर्वीच्या अंड्यात दडली आहेत अनेक रहस्य!

माणसाच्या उत्क्रांती आधी पृथ्वीवर महाकाय डायनासॉर होते ही गोष्ट आपल्याला माहित आहे. शातच शास्त्रज्ञांना दक्षिण चीनमध्ये डायनासोरच्या अंड्याचा एक जीवाश्म सापडला आहे, ज्यामध्ये डायनासोरचं भ्रूण जतन करुन ठेवण्यात आले आहे.

Dinosaur | चीनमध्ये आढळले डायनासॉरचे भ्रूण', 7 कोटी वर्षांपूर्वीच्या अंड्यात दडली आहेत अनेक रहस्य!
egg
Follow us
| Updated on: Dec 23, 2021 | 7:57 AM

मुंबई : माणसाच्या उत्क्रांती आधी पृथ्वीवर महाकाय डायनासॉर होते ही गोष्ट आपल्याला माहित आहे. शातच शास्त्रज्ञांना दक्षिण चीनमध्ये डायनासोरच्या अंड्याचा एक जीवाश्म सापडला आहे, ज्यामध्ये डायनासोरचं भ्रूण जतन करुन ठेवण्यात आले आहे. हे अंड 66-72 मिलियन (7 कोटी 20 लाख) वर्षांपूर्वीचं आहे. सापडलेल्या या भ्रूण ‘बेबी यिंगलियांग’(Baby Yingliang) या नावानं ओळखलं जाणार आहे. अशी माहिती समोर येत आहे. हा भ्रूण दक्षिण चीनमधील जिआंग्झी प्रांतातील गांझू शहरातील शाहे इंडस्ट्रियल पार्कमध्ये ‘हेकोऊ फॉर्मेशन’च्या खडकांच्या खाली आढळला आहे.

कसा दिसतो ‘बेबी यिंगलियांग’

डेलीमेलनं दिलेल्या वृत्तानुसार, बेबी यिंगलियांग अंड्यातील भ्रूण पूर्णपणे वाढ झालेलं आहे. त्याचं डोकं शरीराच्या खाली होतं, त्याची पाठ अंड्याच्या आकारानुसार वळालेली होती आणि त्याचे पाय डोक्याच्या दिशेला होते. ओविराप्टोरोसॉर (oviraptorosaurs) हे 6.7-इंच लांब अंड्याच्या आत विकसित होऊ शकतात, त्यानंतर जन्माला आल्यावर डोक्यापासून शेपटीपर्यंत सुमारे 10.6 इंच लांब असू शकतात.

egg

काय आहे शास्त्रज्ञांची मते

बर्मिंगहॅम युनिव्हर्सिटीच्या (University of Birmingham) जीवाश्मशास्त्रज्ञांनी सांगितलं की, हा भ्रूण ओविराप्टोरोसॉर प्रजातीचा आहे, ज्याला दात आणि चोच नव्हती. ओविराप्टोरोसॉर पंख असणारे डायनासोर होते, जे आशिया आणि उत्तर अमेरिकेतील पर्वतरांगांमध्ये आढळून येत होते. या डायनासोरचा गर्भ अगदी एखाद्या पक्षाच्या गर्भासारखाच दिसून येतो. हा भ्रूण (embryo)विकासाच्या अवस्थेतील एखाद्या पक्ष्यांपेक्षा फारसा वेगळा दिसत नाही. त्यांची चोच आणि शरीराचा आकार वेगळा असायचा. हा भ्रूण आतापर्यंत सापडलेला सर्वात ‘पूर्णपणे ज्ञात डायनासोर भ्रूण’ आहे.

याबाबतच्या एडिनबर्ग विद्यापीठातील पृष्ठवंशीय जीवाश्मशास्त्रज्ञ flon waisum ma (फ्लॉन वैसुम मा) यांनी एका निवेदनात म्हटलंय की, “मी पाहिलेला हा डायनासोरचा अंड्यातील गर्भ हा सर्वात सुंदर जीवाश्मांपैकी एक आहे. हा जीवाश्म खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे. त्यामुळे याचा अभ्यास उत्तम प्रकारे कराता येईल. आम्ही ‘बेबी यिंगलिआंग’च्या शोधाबद्दल आम्ही खूप उत्सुक आहोत.”

संबंधित बातम्या :

सांगलीत साडेतीन वर्षाच्या चिमुरड्याची आईकडून हत्या; वाचा असे काय घडले की पोटच्या गोळ्यालाच संपवले

हरियाणात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या, पत्नी-मुलासह पित्याने लावला गळफास, वाचा नेमके काय घडले?

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.