पाचवीच्या विद्यार्थ्यांचा 80 वर्षे जुना पेपर व्हायरल, कशी असेल बरं ही प्रश्नपत्रिका? बघा

आता शाळांमधील शिक्षणही ऑनलाइनवर आधारित आहे. इतकंच नाही तर प्रोजेक्ट बनवण्याचा ट्रेंडही काही वर्षांपूर्वी आला होता. सुमारे 80 वर्षांपूर्वी 1943 मध्ये एका शाळेची वार्षिक प्रश्नपत्रिका असलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाचवीच्या विद्यार्थ्यांचा 80 वर्षे जुना पेपर व्हायरल, कशी असेल बरं ही प्रश्नपत्रिका? बघा
school studentImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: May 04, 2023 | 1:46 PM

मुंबई: आजचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही गुगलचा वापर करता का? जरा कल्पना करा, सुमारे 70-80 वर्षांपूर्वी लोकांना प्रश्नांची उत्तरे कशी मिळत असत? ते आधी पुस्तकांमध्ये त्या प्रश्नांचं उत्तर शोधत किंवा संबंधित शिक्षकांकडे जाऊन त्यावर उपाय विचारत असत. सध्याचा काळ बदलला आहे. आता लोक ऑनलाइन क्लासेस, फोन किंवा गुगलचा आधार घेऊन आपली उत्तरे शोधतात. आता शाळांमधील शिक्षणही ऑनलाइनवर आधारित आहे. इतकंच नाही तर प्रोजेक्ट बनवण्याचा ट्रेंडही काही वर्षांपूर्वी आला होता. सुमारे 80 वर्षांपूर्वी 1943 मध्ये एका शाळेची वार्षिक प्रश्नपत्रिका असलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

80 वर्षे जुना कॉमर्सचा पेपर व्हायरल

या व्हायरल पेपरमध्ये आपण पाहू शकता की हा पेपर कॉमर्सचा आहे आणि त्यात एकूण 10 प्रश्न विचारण्यात आले आहेत. 1943-44 च्या प्रश्नपत्रिकेत एकूण 10 प्रश्नांपैकी 8 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागत होती आणि विद्यार्थ्याकडे फक्त अडीच तास असायचे. या प्रश्नपत्रिकेत एकूण 100 गुण असून उत्तीर्ण गुण 33 आहेत. हे जुने प्रश्न पाहिल्यानंतर आजच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसेल. सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही प्रश्नपत्रिका पाहून सुशिक्षित लोकही आश्चर्यचकित होतील. हा फोटो निवृत्त आयएएस अधिकारी बद्रीलाल स्वर्णकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

सेवानिवृत्त IAS अधिकाऱ्याने शेअर केली प्रश्नपत्रिका

निवृत्त आयएएस अधिकाऱ्याने ट्विटमध्ये लिहिले की, ‘1943-44 मध्ये भारतात झालेल्या सहामाही परीक्षेत इयत्ता पाचवीच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा पाहा. या पेपरनुसार आजच्या पाचवीच्या मुलांनी एक-दोन प्रश्नांचीही उत्तरे दिली तर ही मोठी गोष्ट आहे. मात्र सर्व प्रश्न आणि गुण हिंदी भाषेत लिहिलेले आहेत, जे आजच्या युगातील विद्यार्थ्यांना समजणे अशक्य आहे. बहुतेक इंग्रजी माध्यमातील मुले हिंदीत लिहिलेल्या आकड्यांपासून अनभिज्ञ असतात. त्यामुळेच त्यांना याचे उत्तर कळणे शक्य होत नाही. हा पेपर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.