सत्यकथा पण अंत भयानक, ९३ वर्षाच्या महिलेशी २३ वर्षाच्या मुलाचं लग्न
पण वय काय म्हणतं, आणि ९१ वर्ष महिलेशी लग्न करुन करणार तरी काय. हा प्रश्न त्याच्या मनात कायम होता.
अर्जेंटिना : म्हातारीचं वय ९१ वर्ष होतं, आणि त्या मुलाचं वय होतं २३ वर्ष, ही घटना फक्त वय, किंवा शारीरीक संबंधांपुरता नाही, या घटनेत खूप सारं बोध घेण्यासारखं आहे. लहानपणी ऐकलेल्या बोधकथेसारखी ही घटना आहे. या ९१ वर्ष महिलेच्या मैत्रिणीचा मुलगा तिच्या घरी राहत होता. तो कायद्याचं शिक्षण घेत होता. पण त्याची परिस्थिती अतिशय बेताची होती. तो आपल्या आजीच्या वयाच्या या महिलेची सेवा करत होता. अर्थात महिलेला पेन्शन होतं, या पेन्शनच्या पैशांची त्या मुलाला आर्थिक मदत होत होती. मुलगा २३ वर्षांचा आणि ही महिला ९१ वर्षांची, वयात अंतर होतं ६३ वर्ष.
एकेदिवशी या आजीने आपल्या नातवासारख्या मुलाला त्याच्याशी लग्न करण्याची विनंती केली. या महिलेने आपल्याला जीवनक्रम चालवण्यासाठी आणि शिक्षणासाठी पैसा दिला आहे, हे त्याच्या मनात होतं, पण वय काय म्हणतं, आणि ९१ वर्ष महिलेशी लग्न करुन करणार तरी काय. हा प्रश्न त्याच्या मनात कायम होता.
वय ९१ वर्ष असलेल्या महिलेबाबत कोणतंही शारीरीक आकर्षण तरी कसं असणार, पण या महिलेने या मुलाला जरा वेगळ्याचं दृष्टीकोनातून समजावलं. मी जिवंत असेपर्यंत सर्व पेन्शन तुझं असेल, आणि माझ्या मृत्यूनंतर पती म्हणून वारसही तुच असशील तर तुला पेन्शन मिळेल, यानंतर तुझ्याकडे वय असल्याने दुसरं लग्नही तू करु शकतो. या मुलाने अखेर ९३ वर्षाच्या महिलेशी लग्न करण्याचा विचार केला आणि लग्न केलंही.
लग्न झालं, हनीमूनलाही गेले, पण हनीमुनलाच महिलेलची शारीरीक स्थिती चांगली असतानाही अचानक मृत्यू झाला. ९३ वर्षाच्या आजीबाईंचा मृत्यू हनीमूनच्या दिवशीच झाला. अंतिम संस्कार झाले, आणि या मुलाने पेन्शन विभागाशी संपर्क साधला.
मात्र काहीतरी उलट झालं, अधिकाऱ्यांनी कागदपत्र पाहत, संशय व्यक्त करत या युवकावरच गुन्हा दाखल केला, पेन्शनसाठी या आजीची फसवणूक केल्याचा हा गुन्हा होता. युवकावर संपत्ती, पेन्शन, बचतीचे पैसे हडपण्याचा प्रयत्न केल्याचेही आरोप झाले.
या युवकाची ही सत्य प्रेम कहाणी त्याने कोठडीत असताना पोलिसांना ऐकवली, पण ते तरी करणार काय. नोव्हेंबर २०१८ च्या या प्रकरणानंतर या युवकाने जेलमधून पलायन देखील केलं होतं. अखेर ९३ वर्षाच्या आजीबाईच्या पेन्शनच्या मोहापाई या युवकाला ना लव्ह मिळालं, ना प्रेम, फक्त धोकाच मिळाला.