चार हात, चार पाय, दोन हृदयाचं बाळ जन्मलं, लोकांची हॉस्पिटलमध्ये पाहायला गर्दी
या बाळाचा जन्म होताच त्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि रुग्णालयाच्या बाहेर तोबा गर्दी झाली, मुलीचे फोटो लागलीच व्हाट्सएपवर फिरायला लागले, लोक श्रद्धापूर्वक तिचे दर्शन घेऊ लागले.
छपरा : बिहारच्या ( Bihar Baby ) सरण जिल्ह्यातील छप्रामध्ये एका महिलेने विचित्र बाळाला ( Unusual Baby ) जन्म दिला आहे. या बाळाला चक्क चार हात, चार पाय आणि दोन हृदयं असल्याने त्याला पाहायला गर्दी जमली आहे. याला बाळ कन्या असल्याने त्याला देवीचा अवतार मानले जात असून सोशल मिडीयावर देखील हे बाळ प्रचंड व्हायरल ( Bihar Viral Baby ) झाले आहे. सर्वसामान्यांना हे बाळ म्हणजे दैवी चमत्कार वाटून या नर्सिंग होमला दर्शनासाठी गर्दी जमायला लागली.
बिहारातील छपरा येथील शामचक येथील संजीवनी नर्सिंग होम येथे मंगळवारी प्रसुता प्रिया देवी या महिलेने एका विचित्र बालिकेला जन्म दिला आहे. या बाळा चार हात, चार पाय आणि चार कान होते. आणि धडधडणारी दोन हृदयं आणि पाठीचे कणेही दोन होते. शिवाय डोक्याचा आकार देखील नेहमीपेक्षा वेगळा होता. या नर्सिंग होम बाहेर हे विचित्र बाळ पहाण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. काही जण या बाळाला दैवी चमत्कार म्हणून त्याचं दर्शन करीत होते. तर इतर लोक बायोलॉजिक घटना म्हणून पाहत होते. या मुलीचा जन्म झाल्यानंतर अवघा वीस मिनिटांत तिचा मृत्यू झाला. या महीलेचे हे पहिलेच अपत्य होते.
हॉस्पिटलचे संचालक डॉ. अनिल कुमार या विचित्र बाळाविषयी माहीती दिली. या बाळाला एक डोके, चार कान, चार पाय आणि चार हात शिवाय दोन स्पायनल कॉड आहेत. तिच्या छातीत दोन हृदयं धडकत होती. हॉस्पिटलने या महिलेची सिजेरीयन शस्त्रक्रिया करण्यात येऊन या बाळाची प्रसुती करण्यात आली. अर्था हे बाळ फारसे जगले नाही. जन्मानंतर 20 मिनिटातच त्याचा मृत्यू झाला.
असे का होते ?
या बाळाच्या आईचे हे पहिलेच बाळ असल्याने ती तणावात होती. त्यातच अपेक्षित वेळेत बाळ जन्माला येऊ न शकल्याने ही महिला तणावाखाली होती. त्यामुळ डॉक्टरांनी तपासण्या करुन बाळाला ऑपरेशन करुन बाहेर काढले. सुदैवाने आईची प्रकृती सध्या चांगली आहे. एकावेळी अनेक अंडबिजांचे एकत्र फलन झाल्यानंतर गर्भाशयात अशी विचित्र बाळं जन्माला येतात परंतू ती फार काळ वाचू शकत नाही. अशी बाळं जन्माला येणे हा काही दैवी चमत्कार नसून अत्यंत सर्वसामान्य घटना आहे. दोन बाळाच्या बिजाचे एका अंड्यात फलन झाल्यावर असा प्रकार घडतो.