AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: सगळ्यांच्या नादी लागा, गेंड्याच्या नाही, प्रवाशांच्या जीप मागे धावणाऱ्या गेंड्याचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, जंगलात एक मोठा गेंडा जीपच्या मार्गात येतो. यादरम्यान जीपवर बसलेला फोटोग्राफर गेंड्याचे फोटो काढत राहतो. पण थोड्या वेळाने गेंडा चिडतो आणि जीपच्या दिशेने पळतो.

Video: सगळ्यांच्या नादी लागा, गेंड्याच्या नाही, प्रवाशांच्या जीप मागे धावणाऱ्या गेंड्याचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ
जीपमागे धावणारा गेंडा
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 5:25 PM

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप बघायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये एक महाकाय गेंडा जीपच्या मागे वेगाने धावताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कुणाच्याही हृदयाचे ठोके चुकतील. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. मात्र, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बहुतांश युजर्स विनाकारण आपला जीव धोक्यात घालू नका, असे सांगत आहेत. (A Rhino Chasing Jeep video goes viral on social media see how netizens reacts)

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, जंगलात एक मोठा गेंडा जीपच्या मार्गात येतो. यादरम्यान जीपवर बसलेला फोटोग्राफर गेंड्याचे फोटो काढत राहतो. पण थोड्या वेळाने गेंडा चिडतो आणि जीपच्या दिशेने पळतो. यानंतरही जीपचा चालक जीप सुरू करत नाही, त्यामुळे गेंडा आणखी भडकतो दरम्यान, गेंडा आणखी वेगाने धावू लागल्यावर जीपचालक आपले वाहन रिव्हर्समध्ये वेगाने मागे नेतो.

चला तर मग आधी हा व्हिडिओ पाहूया.

हा व्हिडिओ फेसबुकवर @AfricanBushKingdom नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. एका यूजरवर कमेंट करताना लिहिले की, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी खूप घाबरलो आहे. त्याचवेळी आणखी एका युजरने कमेंट करताना लिहिले आहे की, जणू एखादा धावणारा गेंडा म्हणत आहे की माणसांनी माझ्या प्रदेशापासून दूर राहा. त्याचवेळी आणखी एका यूजरने कमेंट केली आहे की, गेंडा खूप वेगाने पळत होता. हा चित्रपट नाही, कृपया तुमच्या जीवाशी खेळू नका.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी आपला जीव धोक्यात न घालण्याचा सल्ला दिला आहे. एका युजरने लिहिले आहे की, रिव्हर्स गियरमध्ये गाडी चालवताना मागून हत्तीशी टक्कर झाली असती तर काय झाले असते याची कल्पना करा. तुमच्या आयुष्यात गोंधळ घालू नका.

हेही पाहा:

Video: मृत्यूचा दाढेत फसला, लाथ मारुन बाहेर पडला, पोहणाऱ्यावरील मगरीच्या हल्ल्याच्या व्हिडीओ व्हायरल

Viral Video: प्राण्यांची चेष्टा करण्याआधी शंभरदा विचार करा, नाहीतर काय होतं पाहा…

 

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.