Video: बस, ट्रेन, मेट्रो आणि जहाजाने प्रवास करणारा भटका कुत्रा बोझी, सोशल मीडिया बोझीचीच चर्चा
बोझी इस्तानबुलच्या लोकांसाठी इतका सामान्य झाला आहे, की ते त्याच्यासोबत नेहमी मस्ती करतात. बोझीला प्रवास करण्याची आवड आहे आणि हे करण्यासाठी तो बस असो, ट्रेन असो वा स्पीड बोट, कुणालाही सोडत नाही, विनातिकीट महाशय थेट आत शिरतात आणि आपली जागा पकडून बसतात.
तुम्ही पाळीव कुत्र्यांना त्यांच्या मालकांसोबत सार्वजनिक वाहतुकीत प्रवास करताना कधी ना कधी पाहिलं असेल. मात्र, भटक्या कुत्र्याला असा प्रवास करताना तुम्ही क्विचितच पाहिलं असेल. मात्र तुर्कीचं प्रसिद्ध शहर असलेल्या इस्तांबूलचा एक भटका कुत्रा रोज विविध सार्वजनिक वाहनांनी प्रवास करतो. या कुत्र्याचं नाव आहे बोझी. (A stray dog named Bozi travels on public transport in Istanbul, Turkey. The video went viral)
बोझी इस्तानबुलच्या लोकांसाठी इतका सामान्य झाला आहे, की ते त्याच्यासोबत नेहमी मस्ती करतात. बोझीला प्रवास करण्याची आवड आहे आणि हे करण्यासाठी तो बस असो, ट्रेन असो वा स्पीड बोट, कुणालाही सोडत नाही, विनातिकीट महाशय थेट आत शिरतात आणि आपली जागा पकडून बसतात. बरोबर जिथं जायचं आहे तिथं उतरतात, आणि मस्त फिरतात. फिरुन झालं की पुन्हा कुठलंही वाहन पकडतात आणि आपल्या जुना जागी येतात. बोझीला हे कळतं कसं हा मोठा प्रश्न आहे.
मेट्रोने प्रवास करणारा बोझी:
View this post on Instagram
बोझीने कधीपासून असा प्रवास करायला सुरुवात केली हे कुणालाही माहित नाही, ते याला दररोज कुठल्या ना कुठल्या वाहनात पाहतात. सिवास कैंगल आणि जर्मन शेफर्ड या दोघांचा क्रॉस ब्रीड असलेला बोझी उंचपुरा आणि रुबाबदार आहे. महाशयांचा थाट इतका की, त्यांना पायी चालायचा कंटाळा येतो, म्हणून ते थेट सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात. जेव्हा लोकांना हे कळायला लागलं, तेव्हा लोक बोझीसोबत फोटो आणि व्हिडीओ शूट करु लागले. बघता बघता बोझी स्टार आला, आणि आतातर त्याला कुठल्याही सार्वजनिक वाहतुकीतून फिरण्याची मुभा मिळाली आहे. कुणीही त्याला हकलत नाही, उलट तो आला तर सर्वांना आनंदच होतो. सध्या सोशल मीडियावर बोझी चांगलाच गाजतो आहे, त्याच्या नावाने इन्स्टाग्राम अकाऊंटही सुरु झालं आहे, ज्यावर बोझीचे व्हिडीओ आणि फोटो असतात.
जहाजाने प्रवास करणारा बोझी:
View this post on Instagram
ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरही बोजी हिट
बोजीची लोकप्रियता पाहून स्थानिक महानगरपालिकेने त्याच्यासाठी ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर अकाऊंट सुरु केलं आहे. हेच नाहीतर इतरही अनेक लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट्सवर अकाऊंट ओपन केलं आहे. याद्वारे बोझी लोकांशी संपर्कात राहतो. काही लोक तर दिवसभर बोझीला फॉलो करतात, आणि त्याचे व्हिडीओ बनवून पोस्ट करतात, ज्याला चांगले व्हिव्ह्ज मिळतात.
बोजी काही ठराविक मार्ग अधिक वेळा वापरतात, ज्यात ऐतिहासिक ठिकाणी जाणाऱ्या गाड्या आणि मेट्रो मार्गांचा समावेश आहे. गंमत म्हणजे बोजींना वाहतुकीचे सर्व नियम माहीत आहेत. त्याला एस्केलेटरवर कसे जायचं आणि मेट्रोवर तपासणी केल्यानंतर प्रतीक्षा कशी करावी लागते हेही माहित आहे.
हेही पाहा: