AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | प्लम्बिंगचं सामान घेऊन जाणारा ट्रक भररस्त्यावर पलटला, लोकांनी काय केलं पहा?

साहित्य पडल्याची चाहूल लागताच साहित्य पळवून नेण्यासाठी नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती. (A truck carrying plumbing equipment crashed on the road, see what people did?)

VIDEO | प्लम्बिंगचं सामान घेऊन जाणारा ट्रक भररस्त्यावर पलटला, लोकांनी काय केलं पहा?
प्लम्बिंगचं सामान घेऊन जाणारा ट्रक भररस्त्यावर पलटला
| Updated on: Mar 15, 2021 | 4:31 PM
Share

वर्धा : लोक कधी काय करतील याचा नेम नाही. मिळालेल्या संधीचा कसा फायदा उचलायचा हे वर्ध्यात आज एका घटनेवरुन दिसून आले. वर्ध्यात आज एका ट्रकला अपघात झाला. मात्र घटनास्थळी उपस्थित लोकं अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी ट्रकमधील सामान पळविण्यात गुंतल्याचे दिसून आले. गुजरात येथून रायपूरला प्लमबिंगचे साहित्य घेऊन जाणारा ट्रक अनियंत्रित झाल्याने उलटला. वर्ध्यातील जलालखेडा कारंजा मार्गावर हा अपघात घडला आहे. ट्रक उलटल्यावर त्यातील साहित्य पूर्णपणे रस्त्यावर विखुरले गेले. साहित्य पडल्याची चाहूल लागताच साहित्य पळवून नेण्यासाठी नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती. (A truck carrying plumbing equipment crashed on the road, see what people did?)

50 लाखांच्या साहित्याची पळवापळवी

सदर अपघातग्रस्त ट्रक हा गुजरात येथून रायपूरला जात होता. या ट्रकमध्ये घरातील उपयोगात येणारे प्लमबिंगचे साहित्य होते. ट्रकमध्ये विविध कंपनीचे 50 लाखांचे साहित्य असल्याचे सांगण्यात येतंय. अपघात घडल्यानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झालाय तर ट्रकचा क्लिनर हा जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रक उलटल्याची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. रस्त्यावर विखुरलेले ट्रकमधील सर्व साहित्याची पळवापळवी करायला नागरिकांनी सुरवात केली. साहित्य रस्त्यावर दिसताच दुचाकीने जाणारे असो की पायदळ किंवा ट्रकने जाणाऱ्यांनी वाहन थांबवत त्यातील लागेल ते साहित्य पळविले एवढंच नव्हे तर यात परिसरातील नागरिकांनीही आपले हाथ साफ केले.

व्यावसायिकाकडे चालला होता ट्रक

ट्रकमध्ये शौचालयाच्या वेगवेगळ्या आकाराच्या इंडियन शीट, , बेसिन, कंबोड, वॉश बेसिन, युरिन शीट, प्लम्बलिंगला लागणारे साहित्य होते. हा ट्रक रायपूरला एक व्यावसायिकाकडे माल घेऊन चालला होता. मात्र कारंजाजवळ चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटला आणि सर्व साहित्य रस्त्यावर विखुरले गेले. याचा संधीचा स्थानिक नागरिकांनी फायदा घेत साहित्य पळवले.

अद्याप गुन्हा दाखल नाही

या घटनेची माहिती मिळताच कारंजा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस घटनेचा तपास करीत आहेत. नेमकं किती साहित्य पळवलं हे पोलिस तपासात निष्पन्न होईल. मात्र याप्रकरणी ट्रक मालक आला नसल्याने अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. ट्रक मालकाच्या तक्रारीनंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात येईल. (A truck carrying plumbing equipment crashed on the road, see what people did?)

इतर बातम्या

केळीच्या सालाचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहिती आहेत का? वाचा…

बिहारमधील पपई शेती करणारं गाव, शेतकऱ्यांची वर्षाकाठी लाखो रुपयांची कमाई

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.