Video | हवेत उडत येते पार्सल,आकाशातून येणाऱ्या डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ व्हायरल
सोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओत डिलिव्हरी बॉय हवेतून उडत येऊन सामानाचे डिलिव्हरी करताना दिसत आहे. हा डिलिव्हरी बॉय एखाद्या पक्षा प्रमाणे हवेतून उडत येतो आणि दुबईतील एका नागरिकाला डिलिव्हरीचे पॅकेट देतो.
मुंबई | 6 नोव्हेंबर 2023 : आपण ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर आपली वस्तू डिलिव्हरी बॉय स्कूटरवरुन किंवा अन्य वाहनातून आणताना आपण पहातो. मोठी वस्तू असेल तर चार चाकी किंवा तीन चाकी वाहनातून येत असते. परंतू ऑनलाईन डीलिव्हरीबाबत दुबई येथे वेगळाच प्रयोग केला आहे. तेथे एका डिलिव्हरी बॉयने चक्क हवेत उडत येत वस्तू डिलिव्हरी केल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत. नेहमीच दुबईत नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर करीत सर्वांना भंडावून सोडत असते. आता उडणारे डिलिव्हरी बॉय पाहून तुम्ही देखील दुबईच्या प्रेमात पडाल..
सोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओत डिलिव्हरी बॉय हवेतून उडत येऊन सामानाचे डिलिव्हरी करताना दिसत आहे. हा डिलिव्हरी बॉय एखाद्या पक्षा प्रमाणे हवेतून उडत येतो आणि दुबईतील एका नागरिकाला डिलिव्हरीचे पॅकेट देऊन पुन्हा हवेत उडत जातो. या व्हिडीओत आपण पाहू शकता, की एक डिलिव्हरी बॉय हवेतून उडत येताना दिसतो. त्याला पाहून ग्राहक हात हलवून त्याला आपल्या जवळ बोलावतो. त्यानंतर तो त्या ग्राहकाला पिशवीतून त्याची वस्तू काढून देतो. या अनोख्या पद्धतीने अवघ्या 15 मिनिटांत प्रोडक्ट त्याला मिळते. या ऑनलाईन शॉपिंग कंपनीचे नाव नून ( NOON ) असल्याचे म्हटले जाते. ही सौदी अरब येथील ई-कॉमर्स कंपनी असल्याचे म्हटले जाते.
येथे पाहा व्हिडीओ –
View this post on Instagram
या व्हिडीओला सोशल मिडीयावर इंस्टाग्रामवर स्वत: शॉपिंग कंपनी नून हीने तिच्या अधिकृत आयडी noon_uae ने शेअर केले आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 12 मिलियन म्हणजे 1.2 कोटी लोकांनी पाहीला आहे. तर 4 लाखाहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक्स केले आहे. या व्हिडीओवर अनेक लोकांनी विविध प्रतिक्रीया दिल्या आहेत. कोणी म्हटले की, मी भारतातून आहे. आमच्या येथे सामान डिलिव्हरी होऊ शकते का ? तर कोणी विचारत आहे की या नोकरीसाठी अर्ज करु शकतो का ? तर अन्य एका युजरने म्हटले आहे की मला या डिलिव्हरी बॉयची नोकरी पसंद आहे. तर एका युजरने एका युजरने या व्हिडीओला एडींटींग व्हिडीओ म्हणून खोटे ठरविले आहे.