सात वर्षाच्या मुलाने चालवले विमान, सोशल मीडियात व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ

सात वर्षाचा मुलगा पायलट सीटवर बसून रनवे वर विमान चालवताना व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून हे सुरक्षा मानकांचे उल्लंघन असल्याचे म्हटले जात आहे.

सात वर्षाच्या मुलाने चालवले विमान, सोशल मीडियात व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ
सात वर्षाच्या मुलाने चालवले विमानImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Oct 15, 2022 | 8:02 PM

सोशल मीडियावर लहान मुलांच्या कलाकारीचे, मस्तीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर कधी कधी प्रसिद्धीसाठी केलेल्या स्टंटबाजीचे व्हिडिओ असतात. सध्या अशाच एका व्हिडिओची चर्चा सोशल मीडियात (Social Media) सुरु आहे. हा व्हिडिओ एका सात वर्षाच्या मुलाचा असून, हा मुलगा व्हिडिओत पायलटच्या सीटवर (Pilot Seat) बसून चक्क विमान चालवताना (Boy operating aeroplane) दिसत आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चांगलीच खळबळ माजली आहे.

मुलगा रनवे वर चालवत आहे विमान

हा व्हिडिओ सूरतमधील असल्याचे बोलले जात आहे. व्हिडिओ @Jitendray050691 या अकाउंटवरुन ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. सात वर्षाचा मुलगा पायलट सीटवर बसून रनवे वर विमान चालवताना व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून हे सुरक्षा मानकांचे उल्लंघन असल्याचे म्हटले जात आहे.

हे सुद्धा वाचा

नियमांचे उल्लंघन

मुलाच्या शेजारी बसलेली व्यक्ती मुलाला विमान चालवण्याबाबत सूचना देत असल्याचे व्हिडिओत ऐकू येत आहे. मुलाला पायलट सीटवर बसवून विमान चालवण्यास देणे हे केवळ नियमांचे उल्लंघन नाही तर सुरक्षा मानकांच्या विरोधात आहे.

सिंगल इंजिन विमान चालवत आहे मुलगा

हा व्हिडिओ सुरतमधील असून व्हिडिओतील हे विमान सिंगल इंजिन आहे. मुलाने एव्हिएशन हेडसेट घातला आहे आणि स्टीयरिंग व्हील धरलेला दिसत आहे. यावरुन हे स्पष्ट होते की, हे मूल फक्त फोटोग्राफीसाठी तिथे बसले नव्हते. मुलाचा छंद पूर्ण करण्यासाठी लोक नियमही धाब्यावर बसवताना दिसत आहेत.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.