VIDEO | आंब्याचा रस घालून बनवला ‘आमरस डोसा’, लोक संतापले, म्हणाले ‘देवाला तोंड कसे दाखवणार…’
त्या व्हिडीओच्या छोट्या क्लिपमध्ये एक व्यक्ती आमरम डोसा तयार करीत आहे. डिश तयार करण्यासाठी त्याने सुरुवातीला तवा गरम केला आहे. त्यावर डोसा पीठ पसरवलं. त्यानंतर...
मुंबई : समजा, तुम्हाला वाटतं असेल की, इंटरनेटवरील सगळ्या रेसिपी (weird food combination) संपल्या आहेत. तर तुम्ही थांबा, आमच्याकडे एक नवी रेसिपी आहे. हा पदार्थ खाणे म्हणजे तुमच्यासाठी एक वाईट स्वप्न असेल. विशेष म्हणजे दक्षिण भारतीय खवय्यांना आंब्याच्या रसाचा डोसा (Aamras Dosa) हा पदार्थ बनवल्याचा एक व्हिडीओ (Viral video)सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यापासून अनेकजण दु:खी आहेत. त्याचबरोबर त्या व्हिडीओला कमेंट करुन नाराजी व्यक्त करीत आहेत.
चीज खिसून घातला, कोथिंबीर शिंपडली
त्या व्हिडीओच्या छोट्या क्लिपमध्ये एक व्यक्ती आमरम डोसा तयार करीत आहे. डिश तयार करण्यासाठी त्याने सुरुवातीला तवा गरम केला आहे. त्यावर डोसा पीठ पसरवलं. त्यानंतर मग भरपूर लोणी घातलं आणि आंब्याचा रस ओतला. त्यानंतर त्या कामगाराने चीज खिसून घातला, कोथिंबीर शिंपडली. ते पलटण्याच्या आगोदर त्याने त्याचे काही तुकडे केले आहेत. जो व्यक्ती डोसा तयार करीत आहे. त्याच्या बाजूला आंब्याच्या रसाचा व्हिडीओ आहे.
View this post on Instagram
व्हिडीओ आतापर्यंत दोन लाख लोकांनी पाहिला
व्हायरल व्हिडीओला इंस्टाग्रामवरती Wish2Taste&Travel या नावाच्या पेजवरुन शेअर करण्यातं आलं आहेय. हा व्हिडीओ आतापर्यंत दोन लाख लोकांनी पाहिला आहे. इन्स्टाग्राम युजर्सकडून या व्हिडीओला अधिक वाईट प्रतिक्रिया मिळत आहे. एक युजर म्हणतो, अपरिचितला आता यावे लागेल आता, दुसरा व्यक्ती म्हणतो, “तुम्ही हे करू शकता, याचा अर्थ असा नाही की तुम्ही करू शकता.”
आतापर्यंत रेसिपीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ते लोकांना अधिक आवडले सुध्दा आहेत. परंतु नुकताच व्हायरल झालेला व्हिडीओ लोकांना आवडला नसल्याचं स्पष्ट दिसत आहे.