Mumbai cold : मुंबई गारठली, नेटकरी म्हणाले आता बर्फ पडणार वाटतं, वाचा सोशल मीडियावरील भन्नाट मीम्स
मुंबई गारठली असताना नेटकऱ्यांच्या क्रिएटिव्हीटीला आता धुमारे फुटले आहेत. मुंबईतील तापमान आणखी घसरणार असल्याची बातमी समोर आल्यापासून लोकांनी सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव केला आहे.
मुंबई : सध्या संपूर्ण भारतात कडाक्याची थंडी पडत आहे, मात्र ऐन थंडीच्या दिवसांतही मुंबईकर (Mumbai Cold) पंखा सुरू ठेवतात कारण दरवर्षी मुंबईत थंडी नसल्याच्या बरोबर असते, यंदा मात्र घसलेल्या तापनाने मुंबईकरांना हुडहुडी भरवली आहे. या थंडीत लोक घरी बसणे पसंत करत आहेत. काल मुंबईतही अनेकांना हुडहुडी भरवणारी थंडी होती. मुंबईच्या तापमानात (Mumbai temprature) आणखी बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोमवारी मुंबईच्या तापमानात 6 अंशांपर्यंत घसरण नोंदवली गेली हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. त्याचवेळी मुंबईचा पारा रात्री 14 अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऐन थंडीत नेटकरी मात्र थंड बसत नाहीत, मुंबईच्या थंडीबाबत सोशल मीडियावर अनेक मीम्स पाहायला मिळत आहेत. मुंबईचे हवामान पाहून सोशल मीडियावर फनी मीम्स पाहायला मिळत आहेत. हे मीम्स इतके मजेदार आहेत की ते सर्वत्र व्हायरल झाले आहेत.
थंडीबाबत मीम शेअर करताना एका यूजरने लिहिले की, यावेळी ज्या प्रकारचा थंडी पडत आहे, ते पाहता यावेळेस मुंबईत बर्फवृष्टी नसावी? त्याच वेळी, आणखी एका युजरने लिहिले की, मुंबईतील लोकांना हिवाळा कसा आहे हे अनेक वर्षांनंतर जाणवत आहे. याशिवाय अनेकांनी मजेदार मीम्सच्या माध्यमातून मुंबईच्या हवामानावर आपली प्रतिक्रिया नोंदवली. खाली व्हायरल होत असलेले मीम्स पहा.
Nothing Just Mumbai People Right now :-#mumbaiwinter pic.twitter.com/FlTY8ilpn7
— High_time (@_i_am_innocent) January 24, 2022
Meanwhile Mumbaikars??#mumbai #mumbaiwinter pic.twitter.com/ImWc9pw03z
— umang karia (@umanngkaria) January 24, 2022
#mumbaiwinter Mumbai Winter #Mumbai
My brother as soon as he opens the Window
Me: pic.twitter.com/w89PrVtkGY
— How Football Saved Humans – Great Book to Read (@HowHumans) January 24, 2022
It seems .. #Mumbai Borivali station will be like this by tomorrow. #mumbaiwinter pic.twitter.com/wPiNVVscjs
— Muhib Mirza (@mi_muhib) January 23, 2022
Andheri station today morning #MumbaiWinter pic.twitter.com/5kSHSFuNTy
— Aakash (@okAakash) January 25, 2022
Mumbaikars right now: #mumbaiwinter pic.twitter.com/JRkFNqmsHV
— Andy (@iamandy1987) January 24, 2022
Delhites to Mumbaikars:#mumbaiwinter pic.twitter.com/kG8gCiNg9Z
— Andy (@iamandy1987) January 24, 2022
#mumbaiwinter mumbaikar’s heading to office this morning: pic.twitter.com/JerZkhHVrp
— Rishikesh Jadhav (@rishiijadhav) January 25, 2022
तुम्हा सर्वांना माहित असेलच की मुंबईत देशाच्या इतर भागांच्या तुलनेत कमी थंडी पडते. दिल्लीबद्दल बोलायचे झाले तर दिल्लीत थंडीची लाट आहे. नेहमी कोमट तापनात राहणाऱ्या मुंबईकारांना दरवर्षी थंडी अनुभवायला मुंबईच्या बाहेर जावे लागते, कारण मुंबईत थंडीच्या दिवसातही पंखा सुरू ठेवावा लागतो, यंदा मात्र मुंबईकरांना पहिल्यांदा कडाक्याच्या थंडीचा अनुभव घ्यायला मिळत आहे, त्यामुळे लोक यावर भरभरून व्यक्त होत आहे.