बापरे! उभ्या उभ्या ही महिला नाल्यात कशी पडली?
हा व्हिडिओ स्कूटीवरून जात असलेल्या मुलीचा आहे. गाडी चालवताना अचानक ही मुलगी नाल्यात पडली.
सोशल मीडियावर सर्व प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. आजकाल एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. आपण बरेच अपघाताचे व्हिडीओ पाहतो. यात बरेच अपघात लोकांच्या हलगर्जीपणामुळे घडलेले असतात. हा जो व्हिडीओ व्हायरल होतोय हा अपघात नेमका कसा घडलाय हे कळायला मार्ग नाही. कारण ना कुणाची धडक झाली, ना या गाडीने कुणाला धडक दिली. मग? कसा घडला अपघात?
हा व्हिडिओ स्कूटीवरून जात असलेल्या मुलीचा आहे. गाडी चालवताना अचानक ही मुलगी नाल्यात पडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली, जी सोशल मीडियावर व्हायरल झाली.
तसे पाहिले तर स्कूटी चालवणं सोपं जातं. खासकरून बाइक्सच्या तुलनेत, कारण यामध्ये लोकांना फक्त अॅक्सिलरेटर आणि ब्रेकची काळजी घ्यावी लागते, तर बाइक्समध्येही गिअरच्या अडचणी असतात.
याच कारणामुळे स्कुटीने आज बाजारात चांगली पकड निर्माण केली आहे. आता महिलाच नव्हे तर पुरुषही स्कूटी चालवण्यास प्राधान्य देत आहेत.
अनेकदा महिला स्कूटी हाताळू शकत नाहीत आणि अपघातांना बळी पडतात, असे अनेक वेळा दिसून येते. असाच काहीसा प्रकार या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की सिग्नल लागलाय, त्यामुळे काही बाईकस्वार रस्त्याच्या कडेला थांबलेत. इतक्यात दुसरा दुचाकीस्वार त्यांच्या शेजारी येऊन थांबतो. मग एक स्कुटी चालवणारी महिला मागून येते आणि ही महिला अचानक तोल जाऊन बाजूलाच असणाऱ्या नाल्यात पडते.
उभ्या उभ्या ती मुलगी त्या नाल्यात कशी पडते ते कळत नाही. तो नाला उघडा आहे आणि बराच खोल सुद्धा आहे हेही व्हिडीओ मध्ये दिसून येतं.
Caption please..#viralvideo #scooty #papakipari #Funnyvideo #trending pic.twitter.com/20qjZWELUv
— SuVidha (@IamSuVidha) November 18, 2022
एक अंदाज जर लावला तर असं दिसून येतं की स्कुटी उभी केल्यावर ती महिला लवकर पाय टेकवत नाही. गाडी बॅलन्स होत नाही, तोल जातो आणि ती महिला नाल्यात पडते. व्हिडीओ अतिशय धक्कादायक आहे. बराच वेळ आजूबाजूच्या लोकांनाही कळत नाही की नेमकी झालंय काय?