Video : आफ्रिकन मुलीने केली पाकिस्तानी तरुणांची भयंकर धुलाई, नेटकरी म्हणाले, अन् यांना काश्मीर पाहिजे…
Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक आफ्रिकन महिला दोन पाकिस्तानी लोकांशी भांडताना दिसत आहे. काही वेळाने आफ्रिकन महिला या लोकांवर हल्ला करते.

Viral Video : भारताचा शेजारी असलेल्या पाकिस्तानमध्ये नेहमीच विचित्र परिस्थिती असते. तिथून नेहमीत अशा काही ना काही बातम्या येत असतात, ज्या ऐकून अनेकांना आश्चर्य वाटतं. पाकिस्तानातीही अनेक लोक परदेशात राहतात. सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो पाहून नेटकरीही हैराण झालेत. त्यामध्ये पाकिस्तानी नागरिक एका आफ्रिकन मुलीकडून मार खाताना दिसत आहेत.
आफ्रिकन तरूणीने केली धुलाई
सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. त्या व्हायरल व्हिडिओमध्ये एक आफ्रिकन महिला दोन पाकिस्तानी लोकांशी भांडताना दिसत आहे. काही वेळाने त्या आफ्रिकन महिलेने त्या तरूणांवर हल्ला चढवला. मात्र त्यानंतर त्या तरूणांनीही तिला त्रास देण्यासाठी लोखंडी पाईप उचलला. पण तेवढ्यात त्या महिलेने पलटवार केल्यामुळे त्यांनी पळायला सुरूवात केली आणि धूम ठोकली. त्यानंतर त्या महिलेनेही दगड उचलले आणि त्यांच्यावर हल्ला चढवला.
तेवढ्यात त्या महिलेच्या ओळखीचा इसम तिकडे आला आणि त्याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात ते पाकिस्तानी तरूण फिरून परत मागे आले आणि त्यांनी त्या महिलेवर पुन्हा हल्ला चढवून तिला खाली पाडलं. मग मात्र मध्ये घुसलेल्या तो मित्रच त्याच तरूणांवर हल्ला चढवतो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड वेगाने व्हायरल झाला.
Kalesh b/w Two pakistani guys and one african lady on Road in Qatar pic.twitter.com/hTObkVLDZE
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) January 4, 2024
लोकांच्या मजेशीर कमेंट्स
@gharkekalesh नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. आत्तापर्यंत हा व्हिडिओ तीन लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओवर लोकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. यावर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘पाकिस्तान आर्मी टीमविरुद्ध जिंकू शकत नाही.’ आणखी एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘आफ्रिकन संघाकडून हरले आणि आताही (ते) मात खात आहेत. ‘ त्यांनी नक्कीच अन्न चोरलं असावं ‘ अशी कमेंटही एकाने केली.
