Ram Mandir | मेरी झोपडी में राम आएंगे… लता दीदींच्या आवाजातील गाणं तुफान व्हायरल, कसं झालं शक्य ?
Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराचा आज उद्घाटन सोहळा असून काही तासांतच प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. याबाबत उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक कलाकार या निमित्ताने गाणी लिहित आणि गात आहेत. AI ने लता मंगेशकर यांच्या आवाजात 'राम भजन' तयार केलं आहे. बघता बघता हे भजन खूपच व्हायरल झालं आहे. ते ऐकून अनेक लोक खूपच खुश झाले आहेत.

Ram Aayenge in Lata Mangeshkar Voice: भारतीय सोशल मीडिया, विशेषत: इन्स्टाग्राम, हे एआय जनरेट केलेल्या ऑडिओ आणि गाण्यांसह एडिटेड व्हिडीओजनी भरलेलं आहे. हा ट्रेंड इतका लोकप्रिय आहे की त्यातून अनेक लोकप्रिय व्यक्तींचीही सुटका होत नाही. दररोज आपल्याला त्यातून नवे काही ‘रिलीज’ ऐकायला मिळतात, जे अनेकदा एआय टूल्स वापरून प्रसिद्ध व्यक्तींच्या आवाजात तयार आणि शेअर केले जातात. याशिवाय या जगातून निघून गेलेल्या कलाकारांच्या आवाजातील गाणी पुन्हा तयार करण्यासाठी लोकांनी AI चा वापर केला आहे.
गानकोकिळा, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतरही त्यांचा अवीट गोड आवाज आणि त्यांची गाणी लाखो रसिकांच्या स्मरणात आजही आहेत. अलीकडेच, सोशल मीडियावर एक मोहक क्लिप प्रसारित झाली , गानकोकिळा, दिवंगत गायिका, लता मंगेशकर यांच्या आवाजातील ‘राम आएंगे तो अंगना सजाऊंगी’ या गाण्याचे व्हायरल रिक्रिएशन दाखवण्यात आले होते. अयोध्येतील राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्या दरम्यानच रिलीज झाल्याने हे भजन आणि ती क्लिप खूप व्हायरल आली आहे.
अयोध्येतील राम मंदिराचा आज उद्घाटन सोहळा असून काही तासांतच प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. याबाबत उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक कलाकार या निमित्ताने गाणी लिहित आणि गात आहेत. त्याच दरम्यान, लता मंगेशकर यांच्या आवाजातील हे भजन खूप व्हायरल होत आहे. AI ने लता मंगेशकर यांच्या आवाजात राम भजन सादर केले आहे. हे राम भजन सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. लता मंगेशकर यांच्या आवाजातील हे भजन लोकांना प्रचंड आवंडल असून अप्रतिम अशीच दाद रसिक श्रोत्यांकडून मिळत आहेत.
The most appropriate use of AI so far… pic.twitter.com/ClkDSF9e6u
— Ranvijay Singh (@ranvijayT90) January 20, 2024
सोशल मीडियावर झालं शेअर
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म x (पूर्वीचं ट्विटर) यावर हे भजन खूप व्हायरल होत असून अनेकांनी ते शेअर केलं आहे. हा व्हिडीओ पाहून आणि दिदींचा आवाज ऐकून अनेक लोकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. ‘ प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर यापेक्षा चांगले काहीही नाही, मी मूळ गाणं कधी ऐकलं नाहीये, पण हे मात्र अगदी, पूर्ण ऐकलंय’ अशी कमेंट एका युजरने केली आहे.
सच कहूं इससे अच्छा और कोई नहीं है असली वाला तो मैं कभी सुनता नहीं था इसे पुरा सुना
— देव 🚩 (@I_DEV_1993) January 20, 2024
I have no clue why this brought tears to my eyes… Lata ji ❤️❤️❤️
— Utkarsh Gupta (@PaneerMakkhani) January 21, 2024
पण काहींना हे फारस आवडलं नाही. या गाण्यातील आवाज लता मंगेशकर यांच्याशी मिळता-जुळता असला तरी त्यात भाव नाहीत, गाण्यात ते भाव कमी जाणवतात अशी कमेंट एका युजरने केली. त्या (लता मंगेशकर) गाण्यात जीव ओतायच्या, असंही त्याने नमूद केलं. तर दुसऱ्या यूजरने लिहीलं की ‘हा एक चांगला प्रयत्न आहे पण दिदींच्या आवाजात जी जादू होती, ती (गाण्यात) यात नाही.’ एका युजरला तर हे गाणं खूपच आवडलं, मी हे (भजन) तासनतास ऐकू शकते असे त्याने लिहीले.
To be honest it doesn’t sound like Lata Mangeshkar Ji. It is a great Bhajan but not close to what she would have sung it like. She knew how to put emotions in it.
— बोधीराज BodhiRaj (@Bodhiraj1) January 21, 2024
एकंदरच AI ने सादर केलेला हा प्रयत्न वेगळा ठरला असून त्यावर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. दिदींचा आलाज ऐकून चाहते आनंदले आहेत.
