‘पुष्पा’ची क्रेझ काही कमी होईना! आता एअर होस्टेसनं ‘Sami Sami’वर केला अप्रतिम डान्स

गेल्या काही दिवसांपासून अल्लू अर्जुन(Allu Arjun)च्या पुष्पा द राइज (Pushpa the Rise) या चित्रपटातलं 'सामी सामी' (Sami Sami) हे गाणं सोशल मीडियावर चर्चेत आहे. लोक या गाण्यावर खूप रील करताना दिसत आहेत. आता एका एअर होस्टेसचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती पुष्पा चित्रपटातल्या 'सामी सामी' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

'पुष्पा'ची क्रेझ काही कमी होईना! आता एअर होस्टेसनं 'Sami Sami'वर केला अप्रतिम डान्स
नृत्य करताना एअर होस्टेस
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 12:39 PM

Dance on Sami Sami Song : गेल्या काही दिवसांपासून अल्लू अर्जुन(Allu Arjun)च्या पुष्पा द राइज (Pushpa the Rise) या चित्रपटातलं ‘सामी सामी’ (Sami Sami) हे गाणं सोशल मीडियावर चर्चेत आहे. लोक या गाण्यावर खूप रील करताना दिसत आहेत. हे गाणे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलं आहे. या गाण्याची लोकांची क्रेझ अशी आहे, की या गाण्याला प्रचंड व्ह्यूज मिळाले आहेत. यावरून हे गाणं लोकांना खूप आवडत असल्याचं स्पष्ट झालं आहे. आता एका एअर होस्टेसचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती पुष्पा चित्रपटातल्या ‘सामी सामी’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सर्वांना आकर्षित करणारा आहे, त्यासोबतच तो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

दाक्षिणात्य पोषाखात दिसतेय सुंदर

व्हिडिओमध्ये ही एअर होस्टेस दाक्षिणात्य पोशाख घालून डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तिनं तिच्या आउटफिटला मॅच करणारा मेकअपही केला आहे. सोशल मीडिया यूझर्सना तिचा डान्स आणि वेशभूषाही आवडतेय. व्हिडिओमध्ये डान्स करत असलेल्या मुलीचं नाव आयत उर्फ ​​आफरीन आहे. तिचा हा व्हिडिओ सर्वांना भुरळ घालत आहे.

सोशल मीडियावर सक्रीय आयत

हा व्हिडिओ एअर होस्टेसच्या एका सहकाऱ्यानं आपल्या कॅमेऱ्यानं रेकॉर्ड केला आहे. त्यानंतर तो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. आता हा व्हिडिओही चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, की और बहुत सारी रिक्वेस्ट इस सॉन्ग के लिए… हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूझर्सही यावर जोरदार कमेंट करत आहेत. आयत सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि यूझर्सला तिच्या पोस्ट्सबद्दल अपडेट ठेवते.

‘माणिके मागे हिते’वरही केला होता डान्स

याआधी आयतनं त्यावेळच्या सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक ‘माणिके मागे हिते’ या गाण्यावर रील बनवून इंटरनेट विश्वात खळबळ उडवून दिली होती. विमानातच तिनं या गाण्यावर डान्स केला. जो रातोरात व्हायरल झाला. श्रीलंकन ​​गायिका योहानी डिलोका डी सिल्वानं हे गाणं गायलं होतं.

आणखी बातम्या

Video | #Srivalli | हवाई सुंदरीला आवरला नाही मोह! श्रीवल्लीवर हुकस्टेप करणारी एअरहॉस्टेस पाहिली का?

Video : होणाऱ्या बायकोच्या एन्ट्रीच्या आनंदात नवरदेवाचा भांगडा, पुढे काय झालं, तुम्हीच पाहा

Video: द ग्रेट खलीही झाला अल्लु अर्जुनचा फॅन, हटके अंदाजात म्हणाला…पुष्पाराज, मैं झुकेगा नहीं!

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.