Airport : तुमच्याकडे धोकादायक वस्तू आहे का? प्रवाशी म्हणाला- होय, अधिकारी म्हणाला- एकदम सुंदर आहे, जा घेऊन
Airport News : तर हा किस्सा विमानतळावरील आहे. विमानतळावर तुमच्याच सामानाची, वस्तूचीच नाही तर तुमची सुद्धा तपासणी केली जाते. तुमच्याकडे एखादी धोकादायक वस्तू तर नाही ना, यासाठी हा तपासणी होते. तिथेच मग अशी खसखस पिकली.

एखादा प्रवासी विमानात धोकादायक सामान, वस्तू तर घेऊन जात नाही ना, याची अगोदरच खातरजमा करण्यात येते. कारण एकदा विमानाने उड्डाण केल्यावर मग प्रवाशांच्या सुरक्षेला धोका उत्पन्न होऊ शकतो. हे संकट टाळण्यासाठी विमानतळावर चेकइन दरम्यान एअरलाइन कर्मचारी प्रवाशांना काही प्रश्न विचारतता. त्यातील पहिला प्रश्न हा एकसारखा, तुम्ही तुमचे सामान स्वतः भरले का? हा असतो. त्यानंतर काही वस्तूंची नावे घेत, ही तुमचीच आहेत का, अशी विचारणा करण्यात येते. प्रत्येक विमानतळावर कमी अधिक प्रमाणात हा रोजचाच संवाद घडतो. त्यामागे प्रवाशांची सुरक्षा ही प्राथमिकता असते.
तर पॅसेंजरचे उत्तर ऐकल्यानंतर बॅगजची चेकइन प्रक्रिया पूर्ण होते. त्यानंतर या बॅग विमानात पाठवण्यात येतात. काही अशाच प्रकारची चेकइनची प्रक्रिया एका परदेशी विमानतळावर सुरू होती. चेकइन प्रक्रियेदरम्यान विमानतळावरील कर्मचाऱ्याने नियमितपणे तोच प्रश्न केला. तुम्ही सोबत एखादी धोकादायक वस्तू घेऊन जात आहात का? हा प्रश्न ऐकताच प्रवासी म्हणतो, होय, माझ्याकडे एक खतरनाक वस्तू आहे. ती वस्तू पाहताच विमानतळावरील कर्मचाऱ्याचा साशंक चेहरा क्षणात हसरा होतो.
विमानतळ कर्मचारी या प्रवाशाला विचारतो, तुमच्याकडे एखादी धोकादायक वस्तू आहे का? तुमच्या बॅगमध्ये लिथियम बॅटरी, इलेक्ट्रॉनिक्स आयटम, काही ज्वलनशील वस्तू आहे का? असा सवाल कर्मचारी विचारतो. तेव्हा प्रवासी आपल्या पत्नीकडे पाहत म्हणतो केवळ एक धोकादायक वस्तू आहे. त्याचे उत्तर ऐकून कर्मचारी म्हणतो सुंदर आहे. तुम्ही हा धोका पत्करू शकता, सोबत नेऊ शकता. हा प्रसंग एक दुसरा प्रवासी त्याच्या कॅमेऱ्यात कैद करतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.




कर्मचारी आणि नवऱ्याचा हा संवाद पत्नीच्या कानावर पडतो. तेव्हा ती गंमत म्हणून पतीच्या मागे त्याला मारण्यासाठी धावते. या व्हिडिओत हे विमानतळ कुठे आहे हे काही स्पष्ट दिसत नाही. पण पत्नी ही धोकादायक असल्याचे म्हणताच, कर्मचारी सुद्धा स्मित हास्य करतो.