मुलींचा दमदार परफॉर्मन्स! Viral Video पाहून तुमचेही पाय थिरकतील
सध्या अशाच एका डान्सच्या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. यामध्ये शंकर, एहसान-लॉय आणि हार्ड कौर यांच्या 'मूव्ह युवर बॉडी' गाण्यावर दोन मुली जबरदस्त मूव्ह दाखवताना दिसत आहेत.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, दोन मुली एका स्टुडिओमध्ये 'जॉनी गद्दार' चित्रपटातील 'मूव्ह युवर बॉडी' गाण्यावर नाचताना दिसत आहेत.
मुंबई: इंटरनेटवर असे अनेक व्हिडिओ आहेत, जे आपल्याला वेड लावतात. अशा क्लिपमध्ये डान्स व्हिडिओंचाही समावेश आहे. यातील काही मजेशीर आहेत, तर काहींमध्ये डान्सर्स अशा किलर मूव्ह दाखवतात की विचारू नका. यामुळेच लोक डान्सचे व्हिडिओ मोठ्या आवडीने पाहतात. सध्या अशाच एका डान्सच्या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. यामध्ये शंकर, एहसान-लॉय आणि हार्ड कौर यांच्या ‘मूव्ह युवर बॉडी’ गाण्यावर दोन मुली जबरदस्त मूव्ह दाखवताना दिसत आहेत.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, दोन मुली एका स्टुडिओमध्ये ‘जॉनी गद्दार’ चित्रपटातील ‘मूव्ह युवर बॉडी’ गाण्यावर नाचताना दिसत आहेत. मुलींनी इतक्या किलर मूव्ह दाखवल्या आहेत की विचारू नका. हा व्हिडिओ पाहून तुमचेही पाय थिरकतील. व्हिडिओतील मुलीची स्टाईलही पाहण्यासारखी आहे. याशिवाय दोघांची एनर्जीही अप्रतिम आहे. तुम्ही हा व्हिडिओ चुकवू नका.
मुलींचा दमदार परफॉर्मन्स @dancersofindia नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आतापर्यंत 1.25 लाखांहून अधिक लोकांनी या पोस्टला लाईक केले आहे, तर अनेक युजर्सनी मनमोकळ्या कमेंट केल्या आहेत. काही जण म्हणाले “किलर मूव्ह आहेत”, तर काहींना त्याची स्टाइल आवडली आहे.
View this post on Instagram
एका यूजरने कमेंट केली, बॉस काय एनर्जी आणि एक्सप्रेशन्स आहेत. त्याच वेळी, दुसरा वापरकर्ता म्हणतो, मला हावभाव ठीक वाटतात, परंतु त्यांच्या मुव्हज किलर आहे.