दिल जीत लिया! तरुण आजोबा शर्यतीत धावले, लोकं प्रेमात! व्हिडीओ व्हायरल
आजोबांना पाहून मैदानात उपस्थित असलेले सर्वजण त्याच्या धाडसाचे कौतुक करू लागले आणि टाळ्या वाजवण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत. तुम्ही आधी हा सोशल मीडियावर व्हायरल होणारा पाहा..

असं म्हणतात की वय आणि उत्साह यांचा परस्परांशी काहीच संबंध नसतो. तुमचं मन जर उत्साही असेल तर तुम्ही कुठल्याही वयात काहीही करू शकता. अशाच एक तरुण आजोबांचा व्हिडीओ व्हायरल होतोय. 102 वर्षांचे या आजोबांनी चक्क शर्यतीत भाग घेतलाय. खरंच काही वयस्कर लोक इतके सक्रिय असतात की आजच्या पिढीलाही लाज वाटते. या व्हिडीओमध्ये एका वयोवृद्ध आजोबांनी आपल्या स्टाईलने सर्वांना चकित केलं आहे. या आजोबांनी शर्यतीत भाग घेतला आणि शर्यत पूर्ण सुद्धा केली. आजोबांना पाहून मैदानात उपस्थित असलेले सर्वजण त्याच्या धाडसाचे कौतुक करू लागले आणि टाळ्या वाजवण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत. तुम्ही आधी हा सोशल मीडियावर व्हायरल होणारा पाहा…
व्हिडीओ
“Never put an age limit on your dreams.”
This man was born in 1917, running a race at age 102 pic.twitter.com/cvabjbcOXb
— Vala Afshar (@ValaAfshar) September 5, 2022
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 41 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये सर्वजण या वृद्ध व्यक्तीला मागे टाकताना दिसत आहेत.
बहुतेक लोकांचं लक्ष शर्यत जिंकणाऱ्या किंवा सहभागींवर नव्हतं तर या वृद्ध माणसावर होतं. या शर्यतीत हे आजोबा शेवटच्या स्थानावर आले. असं असलं तरी त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय.
हा व्हिडिओ पाहून अनेकांना सुखद धक्का बसलाय. का नाही बसणार? १०२ वर्षांचे आजोबा जेव्हा उत्साहात, कसलाच विचार न करता शर्यतीत धावतात. एक सकारात्मकता येते.
हा व्हिडिओ आतापर्यंत 34.4 मिलियनपेक्षा जास्त वेळा पाहिला गेलाय. लाखो लोकांनी हा व्हिडिओ लाइक केलाय. हजारो लोकांनी व्हिडिओ रिट्विटही केलाय. कमेंट सेक्शनमध्येही लोक प्रतिक्रिया देण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाहीत.