Video | तो आला, सगळ्यांनी त्याला पाहिलं आणि सगळे जागच्या जागीच थांबले! फक्त एकाला सोडून, कोण होता तो?

Indian Rock Paython : हा व्हिडीओ शेअर केला आहे राजेश अब्राहम यांनी. कोची सीपोर्ट-एअरपोर्ट रस्त्यावर कक्कानड नावाचा परीसर आहे. तिथे असलेल्या सिग्नलजवळ ही घटना घडली. 10 जानेवारीला हा व्हिडीओ राजेश यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

Video | तो आला, सगळ्यांनी त्याला पाहिलं आणि सगळे जागच्या जागीच थांबले! फक्त एकाला सोडून, कोण होता तो?
Twitter Video मधून काढण्यात आलेला Screenshot
Follow us
| Updated on: Jan 11, 2022 | 11:57 PM

अचानक रस्त्यावर रात्रीच्या अंधारात सरपटणारे प्राणी दिसत नाही. पण एका रस्त्यावर एक अवाढव्य अजगर दिसला. या अजगराला पाहून अनेक जण जागच्या जागी थबकले. दोन्ही दिशेनं जाणारी वाहतूक जागच्या जागी थांबले. दोन्ही दिशेनं वाहनांच्या रांगा लागायला सुरुवात झाली. अजगर आपल्या ऐटीत रस्ता क्रॉस करत होता. निवांत. संथ. शांतपणे त्याचं रस्ता क्रॉस करणं सुरु होतं. रस्त्याच्या दोन्ही दिशेनं जाणारी वाहतूक अडवून ऐटीत निघालेल्या या अजगराचा संथपणा एका डिलिव्हरी बॉयला मात्र काही भावला नाही. अजगराच्या नाकावर टिच्चून या दुचाकीस्वारानं आपली बाईक धूमस्टाईल पळवली. हा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडीओही ट्वीटरवरुन (Twitter Video) शेअर करण्यात आला आहे. ही घटना घडली आहे, कोचीमधील (Kochi Road) एका रस्त्यावर. रस्त्याच्या मधोमध उभं राहुन हायवेवरुन रस्ता ओलांडणाऱ्या या अजगराचा (Python) व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

हा व्हिडीओ शेअर केला आहे राजेश अब्राहम यांनी. कोची सीपोर्ट-एअरपोर्ट रस्त्यावर कक्कानड नावाचा परीसर आहे. तिथे असलेल्या सिग्नलजवळ ही घटना घडली. 10 जानेवारीला हा व्हिडीओ राजेश यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक सुरु असताना काही सर्पप्रेमींना एक सरपटणारा अवाढव्य प्राणी दिसला. म्हणून त्यांनी वाहतूक थांबवली. यावेळी एक भलामोठा अजगर रस्ता ओलांडत असल्याचं पाहून अनेक जण रस्त्यावर थांबून व्हिडीओ रेकॉर्ड करु लागले. इंडियन रॉक पायथन जातीहा हा प्राणी असून रस्ता ओलांडताना त्याचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

दरम्यान, शक्यतो अजगराच्या वाट्याला कुणी जात नाही. पण स्विगीवाला आपल्या कर्तव्याबाबत फारच कटीबद्ध असल्याचं दिसलं. सगळे इंडियन रॉक पायथला बघून जागीत थबकले होते. पण फुड डिलिव्हरीसाठी जात असलेल्यानं केलेलं धाडसही या व्हिडीओमध्ये कैद झालंय. चक्क या अजगरासमोरुन हा स्विगीवाला धूम स्टाईल दुचाकी पळवत सुसाट निघाला. अर्थात तो सुसाट निघून आपल्या फूडची डिलिव्हरी करुन परतलाही असेल. पण तोपर्यंत रस्त्यावर इंडियन रॉक पायथला बघून जे चकीत झालेले काही भानावर आले असतील, अशी शक्यता कमीच आहे. एवढा मोठा अजस्त्र प्राणी बघून कुणाचंही भान हरपेल. त्याला स्विगीवाला अपवाद ठरला, हे विशेष!

पाहा व्हिडीओ –

संबंधित बातम्या –

VIDEO : खतरनाक व्हिडीओ! 6 सिंहांसह महिलेची जंगलात सवारी, व्हिडीओ व्हायरल, लोक म्हणाले हा निव्वळ वेडेपणा…

Video | गायीकडून दूध जास्त मिळावं म्हणून या शेतकऱ्यांनं केलेला जुगाड ‘सुपर से भी ऊपर’ आहे!

Viral : माकडाची फुग्यांसोबत मस्ती, Video पाहून अनेकांना आठवलं त्यांचं बालपण

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.