AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माठाचं पाणी की फ्रिजचं पाणी? काय भारी? उद्योगपती आनंद महिंद्रा तुलना करत म्हणाले…

ते भारतीय गोष्टींचे मोठे चाहते आहेत आणि अनेकदा स्वदेशी नवकल्पनांवरील त्यांचे प्रेम ते दर्शवित असतात. ते या कल्पनांचं समर्थन देखील करतात. भारतातील उन्हाळ्याचा हंगाम पाहता महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी माठ आणि फ्रिजची तुलना केली. होय, तोच तो मातीचा, पाणी गार करण्यासाठी वापरला जाणारा माठ.

माठाचं पाणी की फ्रिजचं पाणी? काय भारी? उद्योगपती आनंद महिंद्रा तुलना करत म्हणाले...
Clay pot water or fridge water
Follow us
| Updated on: May 11, 2023 | 5:40 PM

मुंबई: उद्योगपती आनंद महिंद्रा आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्याला आश्चर्यचकित करत राहतात. महिंद्रा ग्रुपच्या चेअरमन आनंद महिंद्रा यांचे ट्विटर हँडल मनोरंजक, प्रेरणादायी आणि विनोदी ट्विट्सने भरलेले आहे जे बऱ्याचदा सोशल मीडिया वापरकर्त्यांची आवड वाढवते. ते भारतीय गोष्टींचे मोठे चाहते आहेत आणि अनेकदा स्वदेशी नवकल्पनांवरील त्यांचे प्रेम ते दर्शवित असतात. ते या कल्पनांचं समर्थन देखील करतात. भारतातील उन्हाळ्याचा हंगाम पाहता महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी माठ आणि फ्रिजची तुलना केली. होय, तोच तो मातीचा, पाणी गार करण्यासाठी वापरला जाणारा माठ.

माठ हे थंड पाणी साठविण्यासाठी वापरले जाणारे मातीचे भांडे आहे. फ्रिजच्या आधी भारतातील लोक हे मातीचे भांडे वापरत असत, कारण ते खूप थंड असते. आनंद महिंद्रा यांनी एक फोटो शेअर करत दोघांमधील फायदे-तोटे समजावून सांगितले. या पोस्टमध्ये महिंद्रा यांनी लिहिलं आहे की, “खरं सांगायचं तर माठ डिझाइन आणि सौंदर्याच्या बाबतीतही श्रेष्ठ आहे. झपाट्याने वाढणाऱ्या युगात प्लॅनेट पॉझिटिव्हला आधार द्यायला हवा. लोकांनी हा माठ वापरण्यावर भर द्यायला हवा.

फायदा काय आणि तोटा काय?

हे मातीचे भांडे रेफ्रिजरेटरपेक्षा स्वस्त, टिकाऊ आणि पोर्टेबल असल्याचे त्यांनी सांगितले. फ्रिजची किंमत 10,000 रुपये आहे, फक्त 7 ते 15 वर्षे टिकते, देखभालीमध्ये उच्च देखभाल आहे, वीज वापरली जाते आणि पोर्टेबल नाही. गायक अरिजीत सिंगनेही माठ म्हणजेच सुरही बद्दल एक गाणे गायले आहे, पण फ्रीजबद्दल गायले नाही, असाही मजेशीर उल्लेख या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. अनेक ट्विटर युझर्सनी याला सहमती दर्शवली. एका युजरने लिहिलं, ‘माठ फक्त पाणी साठवण्यासाठी आहे. रेफ्रिजरेटरची अनेक गोष्टी ठेवता येतात. ज्यांच्याकडे फ्रिज आहे त्यांच्याकडे माठ देखील आहे कारण यामुळे पाण्याची चव वाढते आणि उन्हाळ्यात ते थंडही राहते. आम्ही दोघांची तुलना करू शकत नाही सर.”