ट्रकमध्ये किचन, व्हिडिओ बनवतो, 1.5 दशलक्ष फॉलोअर्स, एका कल्पनेनंतर बदलले जीवन
truck driver viral video: आनंद महिंद्र यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, राजेश रवानी भाड्याच्या घरात राहत होता. परंतु त्याच्या युट्यूवरील आयडीयाने त्याचे नशीब बदलले. त्याने युट्यूबवरील कामाईतून नवीन घर खरेदी केले आहे.
अब्जाधीश उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. सोशल मीडियावर अनेक गोष्टी शेअर करुन ते चर्चा करत असतात. गेल्या काही दिवसांपासून ते खूपच आगळ्यावेगळ्या पोस्ट ते शेअर करत आहेत. त्या चांगल्या व्हायरल झाल्या आहेत. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर ‘मंडे मोटिव्हेशन’ म्हणून एका ट्रक चालकाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या पोस्टमधून एका ट्रक चालकाची माहिती त्यांनी दिली आहे. त्या ट्रक चालकाचे लाखो फॉलोअर्स आहेत.
ट्रक ड्रायव्हरचा व्हिडिओ शेअर केला
आनंद महिंद्रा यांनी राजेश रवाणी नावाच्या ट्रक ड्रायव्हरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. राजेश रवाणी हा गेल्या 25 वर्षांहून अधिक काळापासून ट्रक चालवत आहे. ट्रकमधून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल नेण्याची काम तो करतो. परंतु त्याचे वेगळेपण म्हणजे तो फूड आणि ट्रॅव्हल ब्लॉगिंगही करतो. यूट्यूबवर त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत. तो व्हिडिओ पोस्ट करून चांगले पैसे कमवतो.
काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये?
आनंद महिंद्रा यांनी एक्स अकाउंटवर 59 सेकंदाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ट्रक चालक राजेश रवाणी ट्रकच्या कॅबिनमध्येच जेवण बनवत आहे. ट्रक कॅबिनचे रुपातंर किचनमध्ये करुन एका स्टोव्ह तो कुकर ठेवत चिकन आणि भात बनवतो. त्याचा व्हिडिओ तो बनवतो. राजेश नेहमी असे वेगवेगळे व्हिडिओ बनवून व्हायरल करत असतो. त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत. राजेश रवानी हा फुड आणि ट्रॅव्हल ब्लॉगर आहे. तो १.५ मिलेनिअर फॉलोअर्ससह सेलिब्रेटी बनला आहे.
Rajesh Rawani, who’s been a truck driver for over 25 years, added food & travel vlogging to his profession and & is now a celebrity with 1.5M followers on YouTube.
He just bought a new home with his earnings.
He’s demonstrated that no matter your age or how modest your… pic.twitter.com/5ccfwjYOff
— anand mahindra (@anandmahindra) April 8, 2024
युट्यूब वरील कमाईतून घेतले घर
आनंद महिंद्र यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, राजेश रवानी भाड्याच्या घरात राहत होता. परंतु त्याच्या युट्यूवरील आयडीयाने त्याचे नशीब बदलले. त्याने युट्यूबवरील कामाईतून नवीन घर खरेदी केले आहे. राजेश यांनी दाखवून दिले आहे की, तुमचे वय किती असो, तुमचा व्यवसाय किती साधारण असेल, परंतु नवीन तंत्रज्ञानाचे अनुकरण करण्यासाठी उशीर करायला नको.