शेंगदाण्याचं कर्ज फेडण्यासाठी 11 वर्षांनंतर भारतात परतले बहीण-भाऊ! Photo Viral

सोशल मीडिया(Social Media)च्या दुनियेत सध्या दोन अमेरिकन अनिवासी (NRI) भारतीयांची जोरदार चर्चा आहे. अमेरिकेत राहणारे दोन एनआरआय भावंडं 25 रुपयांचं कर्ज फेडण्यासाठी भारतात आले होते.

शेंगदाण्याचं कर्ज फेडण्यासाठी 11 वर्षांनंतर भारतात परतले बहीण-भाऊ! Photo Viral
सतैया यांच्या पत्नीला मदत देताना नेमानी प्रणव आणि सुचिता.
Follow us
| Updated on: Jan 06, 2022 | 10:58 AM

सोशल मीडिया(Social Media)च्या दुनियेत सध्या दोन अमेरिकन अनिवासी (NRI) भारतीयांची जोरदार चर्चा आहे. अमेरिकेत राहणारे दोन एनआरआय भावंडं 25 रुपयांचं कर्ज फेडण्यासाठी भारतात आले होते. इथं त्यांनी आंध्र प्रदेशातल्या एका व्यक्तीचा शोध घेतला ज्यानं या भावंडांना 11 वर्षांपूर्वी भुईमूग (Peanut) दिले होते. एवढ्या वर्षांनंतर या दोन भावा-बहिणींनं शेंगदाणा विक्रेत्याचं कर्ज अतिशय अशाप्रकारे फेडलं. आता या दोन भावंडांची सोशल मीडियावर खूप कौतुक केलं जातंय. आजही काही लोकांची सद्सद्विवेक बुद्धी जिवंत आहे, असंच सगळे म्हणताहेत. चला जाणून घेऊ या, ही सर्व कहाणी…

शेंगदाणे तर घेतले, मात्र पैसे विसरले 2010च्या सुमारास घडलेली ही घटना आहे. एनआरआय मोहन त्यांचा मुलगा नेमानी प्रणव आणि मुलगी सुचिता यांच्यासह आंध्र प्रदेशातील यू कोतापल्ली बीचला भेट देण्यासाठी आले होते. इथं मोहन यांनी सतैया नावाच्या भुईमूग विक्रेत्याकडून आपल्या मुलांसाठी शेंगदाणे विकत घेतले होते. त्यानंतर मुलं एन्जॉय करू लागली. मात्र पैसे देण्याची वेळ आली असता पर्स घरीच विसरल्याचं मोहन यांना समजलं. पण सतैया मोठ्या मनाचा निघाला. त्यानं मुलांना शेंगदाणे मोफत दिले. मोहननं तेव्हा सतैयाला वचन दिलं, की तो हे कर्ज लवकरच फेडेल. मग सतैयाचा फोटोही काढला.

अकरा वर्षानंतर घेतला शोध लोक साधारणपणे हे विसरतात. आंध्रच्या मोहन यांच्याबाबतीतही असाच प्रकार घडला आणि कर्जाची परतफेड न करता ते कुटुंबासह अमेरिकेला निघून गेले. मात्र त्यांच्यात प्रामाणिकपणा होता. 11 वर्षांनंतर ते आपल्या मुलांसह भारतात परतले, तेव्हा त्यांनी सतैयाचा शोध लावला आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचं कर्ज फेडलं.

आमदाराची घेतली मदत याचीही रंजक कहाणी आहे. मोहनच्या मुलांनी काकीनाडा शहराचे आमदार द्वारमपुडी चंद्रशेखर रेड्डी यांची या कामी मदत घेतली. आमदार रेड्डी यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर सत्तैयाचा जुना फोटो टाकून एक पोस्ट शेअर केली. त्याचा तत्काळ परिणाम होऊन सत्तैयाची संपूर्ण माहिती मिळाली. पण दुर्दैव, हा आनंदाचा क्षण अनुभवायला सत्तैया या जगात नव्हते. मात्र मोहन यांच्या मुलांनी त्यांचं वचन पूर्ण केलं आणि सत्तैयाच्या कुटुंबाला 25 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला.

Video : मोराच्या अंत्ययात्रेला आला दुसरा मोर, इमोशनल व्हिडिओ व्हायरल

VIDEO : देव तारी त्यास कोण मारी! तीन वाहनांमध्ये भयानक अपघात… मात्र, पुढे असे काही घडले की, पाहुण प्रत्येकजण झाला आश्चर्यचकित

VIDEO : लग्नामध्ये नवरीची धडाकेबाज एन्ट्री, वऱ्हाडी मंडळी आश्चर्याने पहातच राहिले…पाहा व्हायरल व्हिडिओ!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.