“मूर्ती लहान किर्ती महान!” किती छोटा आहे ना हा मुलगा? कामगिरी वाचाल तर धक्का बसेल…
या मुलाबद्दल मीडियातही अनेक लेख लिहिले जातायत. सध्या तो त्याच्या एका नवीन कामगिरीसाठी खूप चर्चेत आहे.
कलाकाराला “कलाकार” ही ओळख असते. त्याची ओळख करून द्यायला इतर कुठल्या गोष्टी, जसं की वय, जन्म, जात, देश अशा इतर गोष्टी लागत नाहीत. तो एक कलाकार आहे हीच ओळख फार. असे अनेक अनेक कलाकार आहेत ज्यांची कलाकृती कडे बघून हे त्यांनीच केलंय का? असा प्रश्न पडतो. मग आपण त्या कलाकृतीकडे बघतो आणि मग त्या कलाकाराकडे बघतो. पुन्हा पुन्हा आपण तेच करतो. का? कारण आपण कलाकाराचा चेहरा, वय, उंची थोडक्यात काय तर त्याचं बाह्यरूप त्याच्या कलाकृतीशी जोडायला जातो. हे सांगायचं कारण काय? एक दहा वर्षाचा मुलगा आहे. ज्याचं पेंटिंग खूप महागडं आहे. ज्याच्या पेंटिंगला अक्षरशः करोडोंची बोली लावली गेलीये. पण याचा फोटो पाहिला तर कुणीच यावर विश्वास ठेवत नाही. पण हे खरं आहे. हे घडलंय!
प्रकरण अमेरिकेतलं! जिथे एका मुलाच्या पेंटिंगवर कोट्यवधींची बोली लावण्यात आली होती. आंद्रेस व्हॅलेन्सिया असं या मुलाचं नाव. हा मुलगा चौथीत शिकतो. याची चित्रं बघून आता याला लिटल पिकासो म्हटलं जातंय.
रिपोर्ट्सनुसार आंद्रेस व्हॅलेन्सियाचं एक चित्र लोकांना इतकं आवडलं की ते प्रदर्शनात ठेवण्यात आलं. त्यावर दोन कोटींपेक्षा जास्त बोली लावण्यात आली.
एवढेच नव्हे तर मोठमोठ्या कलादालनांमध्ये त्यांची चित्रे बसविलेली आहेत. व्हॅलेन्सियाने बनवलेली पेंटिंग्ज पाहण्यासाठी मोठमोठे सेलिब्रिटी येतात आणि त्याची चित्रं लोकांना खूप आवडतात. सध्या हा लिटल पिकासो खूप फेमस आहे.
व्हॅलेन्सियाचे एक पेंटिंग हाँगकाँगमधील फिलिप्स डी प्यूरी मध्ये 1.3 कोटी रुपयांना विकले गेले होते, तर इटलीमध्ये आणखी एक पेंटिंग 1.88 कोटी रुपयांना विकले गेले होते.
इतकंच नाही तर या मुलाच्या कलाकुसरीबद्दल अमेरिकन मीडियातही अनेक मोठे लेख लिहिले जातायत. सध्या तो त्याच्या एका नवीन पेंटिंगसाठी खूप चर्चेत आहे. या पेंटिंगसाठी दोन कोटींपेक्षा जास्त बोली लावली गेलीये.