Video | जंगलातून आला, कुंपनात फसला, वाघाच्या डरकाळीने नागरिकांत घबराट
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक वाघ दिसत आहे. हा वाघ मानवी वस्तीत शिरलाय. मानवी वस्तीत शिरल्यामुळे नेमके काय करावे ते वाघाला समजत नाहीये. वस्तीत वाघ शिरल्यामुळे लोकसुद्धा चांगलेच घाबरले आहेत. मानवी वस्तीत शिरल्यानंतर प्राण वाचवण्यासाठी वाघ जोरात डरकाळी देत आहे.
मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. या मंचावर कधी लोकांच्या वेगवेगळ्या करामती चर्चेचा विषय ठरतात. तर कधी एखाद्या प्राण्याचा मजेदार व्हिडीओ समाजमाध्यमावर आनंदाने पाहिला जातो. मात्र काही व्हिडीओ तर एवढे थरारक असतात की त्यांना पाहून आपल्याला काय करावे तेच समजत नाही. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हासुद्धा असा काहीसा आहे. या व्हिडीओमध्ये एका वाघाची डरकाळी अंगाचा थरकाप उडवणारी आहे. (angry tiger roaring in sundarbans terrible video went viral on social media)
वस्तीत वाघ शिरल्यामुळे लोक चांगलेच घाबरले
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक वाघ दिसत आहे. हा वाघ मानवी वस्तीत शिरलाय. मानवी वस्तीत शिरल्यामुळे नेमके काय करावे ते वाघाला समजत नाहीये. वस्तीत वाघ शिरल्यामुळे लोकसुद्धा चांगलेच घाबरले आहेत. मानवी वस्तीत शिरल्यानंतर प्राण वाचवण्यासाठी वाघ जोरात डरकाळी देत आहे. वाघाचा राग लगेच त्याची डरकाळी पाहून तो किती रागात असेल याची कल्पना येऊ शकते.
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
कुंपनाबाहेर उडी घेऊन वाघाने पळ काढला
व्हिडीओतील वाघ कुंपणामध्ये फसल्यामुळे तो जास्तच चवताळला आहे. शेवटी मोठी झेप घेत त्याने कुंपनाच्या बाहेर उडी घेतली आहे आणि तेथून पळ काढलाय. वाघ पळाल्याचे दृश्यसुद्धा कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सुंदरबनातील असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्याला swamptigerchaser या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.
जंगलाच्या राजाकडून गिधाडाची शिकार, Video पाहून तुम्हीही म्हणाल, ‘काय चपळाई आहे!’
Video | नवरदेव पाहताच नवरी भारावली, केला भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल
Video | पाणीपुरीवाल्याचा प्रताप, लघवी करुन पाण्यात मिसळली, व्हिडीओ पाहून देशभरात संताप
(angry tiger roaring in sundarbans terrible video went viral on social media)
Raksha Bandhan 2021: आपल्या बहिणीला द्या हे गिफ्ट, किंमत कालांतराने वाढतच राहणार#Gold #Rakshabandhan2021 #SIP #Stocks #SystematicInvestmentPlanhttps://t.co/hfm0SKOaDo
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 22, 2021