Video: हत्तीच्या पिल्लाचा पाण्यात दंगा, लोक म्हणाले, हा हुबेहुब शिंच्यान वाटतोय!

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हत्तीचे पिल्लू तलावाच्या पाण्यात आंघोळ करताना दिसत आहे. या पिल्लाचा आनंद पाहून असं वाटतंय की, जणू काही सुट्टीत तो फिरायला इथं आला आहे

Video: हत्तीच्या पिल्लाचा पाण्यात दंगा, लोक म्हणाले, हा हुबेहुब शिंच्यान वाटतोय!
तलावात अंघोळ करणारं हत्तीचं पिल्लू
Follow us
| Updated on: Nov 03, 2021 | 10:04 AM

सोशल मीडियावर असे काही व्हिडिओ आहेत जे एकदा पाहिल्यानंतर मन भरत नाही आणि पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटते. अलीकडच्या काळात असाच एक सुंदर व्हिडिओ लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे, जो पाहून तुमचा दिवस आनंदात जाईल.अनेकदा मुलं पाणी दिसलं की, त्याच्याशी खेळायला लागतात, फक्त माणसांची मुलंच असं करतात असं नाही. तर प्राणीही हेच करतात. असाच काहीसा प्रकार आजकाल समोर आला आहे. ज्यामध्ये छोट्या हत्तीची कृती तुम्हाला खूप गोंडस वाटेल. व्हिडिओमध्ये छोटा गजराज पाण्याचा मनसोक्त आनंद घेत आहे. ( animal video Baby elephant enjoy their Water bath in lake after seeing this video people Say they remember shinchan)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हत्तीचे पिल्लू तलावाच्या पाण्यात आंघोळ करताना दिसत आहे. या पिल्लाचा आनंद पाहून असं वाटतंय की, जणू काही सुट्टीत तो फिरायला इथं आला आहे, पाण्यात हातपाय पसरून आनंद लुटतोय. हत्तींचे कळप सुद्धा आजूबाजूला उभे राहून आंघोळ करत आहेत, जे पिलाला मदत करत आहेत. हत्तीचे पिल्लू आपली सोंड हलवून मजा घेत होते.

व्हिडीओ पाहा

25 सेकंदाचा हा व्हिडिओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यासोबत त्याने कॅप्शन लिहिले की, ‘तुम्ही ‘क्यूटनेस’ची व्याख्या केली तर? व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर यूजर्स आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.

सोशल मीडियावर या व्हिडिओला लोक मोठ्या प्रमाणात पसंती देत ​​आहेत. यामुळेच अनेक युजर्सनी व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया नोंदवली. एका यूजरने म्हटले की, ‘या हत्तीची हालचाल हुबेहूब शिंच्यानसारखी आहे.’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, हे दृश्यं खरोखरच गोंडस आहे, हे पाहिल्यानंतर मला माझे बालपण आठवले. याशिवाय इतरही अनेक यूजर्सनी लिहिले. या व्हिडिओचे कौतुक केले.

हेही पाहा:

Video: वर्षभर गळ्यात टायर घेऊन फिरला, जखमी जिराफाची वनकर्मचाऱ्यांनी अशी केली सुटका!

Video: सासूने बांगड्यांचं विचारलं, तिने मोबाईलचं सांगितलं, सासू-सूनेचं कॉमेडी भांडण व्हायरल

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.