पावसामुळे लग्नाला उशीर झाला, वधू वर छत्री घेऊन मंदिरात!
ज्या मंदिरात त्यांचे लग्न होणार होते, तेथेही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.
तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे लोकांचे जीवन कठीण झाले आहे. रस्ते जलमय झाले असून पाणी साचले आहे. यामुळे लोकांना किती अडचणींना सामोरं जावं लागत आहे, याचा अंदाज तुम्ही लावू शकता, यावरून लोकांच्या लग्नातही चांगलाच गोंधळ होतोय. चेन्नईत मुसळधार पावसामुळे शुक्रवारी काही विवाहसोहळे लांबणीवर पडले. ज्या मंदिरात त्यांचे लग्न होणार होते, तेथेही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वधू-वर छत्री घेऊनही भिजत मंदिराच्या आवारात जाताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की कसा पाऊस पडत आहे आणि वधू-वर एकाच छत्रीत मंदिराच्या दिशेने जात आहेत. छत्री असूनही ते ओले होत आहेत, तसेच खाली रस्त्यावर पाणी भरलेले आहे.
वधू-वर त्याच पाण्यातून मंदिर परिसरात जातात, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे मंदिर परिसरातही पाणी साचण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पण ते तसेच देवाकडे जाऊन पूजा करतात आणि प्रार्थना करतात.
एएनआय या वृत्तसंस्थेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, चेन्नईतील पुलियांथोप भागातील अंजिनियर मंदिरात आज पाणी साचल्यामुळे पाच लग्नांना उशीर झाला. काही महिन्यांपूर्वी लग्न ठरलेल्या जोडप्यांना मंदिरात पाणी साचल्यामुळे रांगा लावाव्या लागल्या.
#WATCH | Tamil Nadu: 5 weddings that were scheduled at Anjineyar temple in Pulianthope were delayed due to rainfall today. Couples lined up for wedding ceremonies were drenched as they walked through the water logged inside the temple. These weddings were scheduled months ago. pic.twitter.com/OA96wQEiz2
— ANI (@ANI) November 11, 2022
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, एका वराने सरकारला मंदिर परिसर आणि इतर सार्वजनिक ठिकाणी साफसफाई करण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे आवाहन केले जेणेकरून इतर कोणत्याही वधू-वरांना लग्नासाठी अशा परिस्थितीचा सामना करावा लागू नये.
शुक्रवारी तामिळनाडूच्या अनेक भागात अधूनमधून पाऊस झाला, त्यामुळे पाणी साचण्याची परिस्थिती निर्माण झाली होती आणि वाहनांची ये-जाही विस्कळीत झाली होती.