Video | अन्ना दुराईंच्या रिक्षात आयपॅडसह टीव्ही, पेपर, मासिके, स्नॅक्स अन् बरंच काही, व्हिडीओ एकदा पाहाच
मोठ्या मोठ्या व्यक्ती दुराई यांच्या रिक्षामधून प्रवास करण्यासाठी रांगा लावून आहेत. दुराई यांच्या रिक्षामध्ये नेमकं काय आहे, हे सांगणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या चेन्नईमधील अन्ना दुराई यांची रिक्षा चांगलीच चर्चेत आली आहे. मोठ्या मोठ्या व्यक्ती दुराई यांच्या रिक्षामधून प्रवास करण्यासाठी रांगा लावून आहेत. दुराई यांच्या रिक्षामध्ये नेमकं काय आहे, हे सांगणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Annadurai rickshaw driever went viral who is providing internet Newspaper WIFI in his rickshaw)
अन्ना दुराई यांच्या रिक्षाची सध्या जगभरात चर्चा
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये अन्ना दुराई यांच्या रिक्षामध्ये काय आहे हे सविस्तरपणे सांगितले आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा अवाक् होऊन जाल. अन्ना दुराई यांच्या रिक्षाची सध्या जगभरात चर्चा होत आहे. ऑफिशियल ह्युमन्स ऑफ बॉम्बे (Official Humans Of Bombay) या इन्स्टाग्राम पेजवर रिल्सच्या माध्यमातून हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे.
रिक्षाचे वैशिष्य काय आहे ?
सध्या चर्चील्या जाणाऱ्या या रिक्षाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या रिक्षामध्ये प्रवाशांसाठी मास्क, सॅनिटायझरची सोय करण्यात आली आहे. तसेच या रिक्षामध्ये मिनी फ्रिजसुद्धा लावण्यात आले आहे. प्रवाशांना कंटाळा येऊ नये म्हणून टीव्ही, पेपर, मासिके, स्नॅक्स, तसेच आयपॅडसुद्धा या रिक्षामध्ये ठेवण्यात आला आहे. या सर्व गोष्टींमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान अतिशय आरामदायी आणि समाधान वाटत आहे. रिक्षाचे भाडे देण्यासाठी त्यामध्ये Card Swapping Machine सुद्धा लावण्यात आले आहे.
इतर बातम्या :
View this post on Instagram
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
अन्ना दुराई यांची रिक्षा तसेच त्यांची यामागची मेहनत सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. सोशल मीडियावर दुराई यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. लोक हा व्हिडीओ पाहून आश्चर्यचकित होत असून या त्याला मोठ्या प्रमाणात लाईक करत आहेत.
इतर बातम्या :
Video | खारुताई-मांजरीमध्ये जबरदस्त मारामारी, व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच !
VIDEO: भारतीय अमेरिकन व्यक्तीकडून कारवर कोट्यावधींच्या सोन्याचा मुलामा, आनंद महिंद्रा म्हणतात…
(Annadurai rickshaw driever went viral who is providing internet Newspaper WIFI in his rickshaw)